Breaking

Thursday, January 12, 2023

दुचाकीवरुन मित्रासोबत जात असताना डंपरची धडक, जळगावात एसटी कर्मचाऱ्याने जीव गमावला https://ift.tt/YU1O3tu

जळगाव: जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निलेश नामदेव बडगुजर (वय ३२ राहणार पाळधी, हल्ली मुक्काम जामनेर) असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली आहे. एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर आणि त्यांचा मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकीवर जात असताना जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ जामनेरकडे येणाऱ्या डंपरने त्याच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील निलेश नामदेव बडगुजर याचा जागीच मृत्यू झाला असून नितीन सोनवणे हे जखमी झाले होते. हेही वाचा -जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मयत निलेश बडगुजर हे जामनेर एसटी डेपो क्लर्क या पदावर कार्यरत होते. सदर घटनेची माहिती मिळताच जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मित्र व नातेवाईकांनी आक्रोश केला. हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. निलेश बडगुजर यांच्या पक्षात पत्नी व एक मुलगा आहे भाऊ असा परिवार आहे.हेही वाचा -पुतण्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू, बातमी ऐकून काकूला हार्ट अटॅकदुसरीकडे जळगावातील पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील एका २७ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी घडली. तरुणाच्या मृत्यूचा त्याच्या काकूला मोठा धक्का बसला. आक्रोश करत असताना काकूला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवत असताना काकूनेही प्राण सोडले. किरण मोरे (वय - २७) असे मृत तरुणाचे तर उषाबाई मन्नु सोनार (वय - ४०) असे तरुणाच्या मृत काकूचे नाव आहे. शहरात एकाच दिवशी पुतण्या आणि काकूची एकत्र अंत्ययात्रा निघाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IqH0EyR

No comments:

Post a Comment