मुंबई: ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघात चार सामन्यांची कसोटी मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चार कसोटी मॅच होणार आहेत. या मालिकेची सुरूवात ९ फेब्रुवारीपासून नागपूर येथे पहिल्या कसोटीने होणार आहे. दर दुसरी कसोटी दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर होणार आहे. मालिकेतील या पहिल्या दोन लढतीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.वाचा- बीसीसीआयने नियुक्त केलेल्या नव्या निवड समितीने सूत्रे हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच निवड आहे. कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करेल तर केएल राहुल उपकर्णधार असेल. दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेल्या रविंद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे. मात्र त्याच्या फिटनेसवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.वाचा- विकेटकीपर म्हणून संघात ईशान किशन आणि केएस भरत यांची निवड करण्यात आली आहे. ऋषभ पंत अपघातात जखमी झाल्यामुळे तो काही महिने निवडीसाठी उपलब्ध असणार नाही. फिरकीपटू म्हणून आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव हे आहेत. तर जलद गोलंदाचांचे नेतृव शमीकडे असेल.वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी असा आहे भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहमद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, असा आहे कार्यक्रम ( 2023 )कसोटी मालिका- पहिली कसोटी- ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूरदुसरी कसोटी- १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्लीतिसरी कसोटी- ०१ ते ०५ मार्च, धर्मशालाचौथी कसोटी- ०९ ते १३ मार्च, अहमदाबादवनडे मालिकापहिली मॅच- १७ मार्च, मुंबईदुसरी मॅच- १९ मार्च, विशाखापट्ट्णमतिसरी मॅच- २२ मार्च, चेन्नई
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6ZlfTKX
No comments:
Post a Comment