Breaking

Tuesday, January 31, 2023

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यासाठी कशी असेल भारताची Playing XI, जाणून घ्या... https://ift.tt/obYPn7p

अहमदाबाद : तिसरा टी-२० सामना हा भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी करो या मरो असाच असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांचा मालिकेत पराभव होणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या टी-२० सामन्यात संघ निवड महत्वाची ठरणार आहे. या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी नेमकी कशी असेल, हे आता समोर आले आहे.सलामीवीर...या सामन्यासाठी भारतीय संघात सलामीच्या जोडीत मोठा बदल होणार आहे. कारण या सामन्यासाठी पृथ्वी शॉ याला भारतीय संघात स्थान देण्यात असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इशान किशन आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागणार आहे. या सामन्यासाठी इशान किशनला संघाबाहेर केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात सलामीच्या जोडीत बदल होणार आहे.मधली फळी...भारताच्या मधल्या फळीत यावेळी कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे समोर येत आहे. भारताच्या मधल्या फळीत राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या यांचा समावेश करण्यात येईल. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर यालाही फलंदाजीत बढती मिळू शकते. त्यामुळे तोदेखील मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकेल.गोलंदाज...भारतीय संघात यावेळी गोलंदाजीमध्ये एक बदल होणार असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या सामन्यात युजवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले होते. कारण दुसऱ्या सामन्याची खेळपट्टी ही फिरकीला पोषक होती. पण तिसरा सामना जिथे होणार आहे ती अहमदाबादची खेळपट्टी तशी नसेल. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात चहलला संघाबाहेर केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. चहलच्या जागी आता भारतीय संघात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी देण्यात येईल. त्यामुळे भारतीय संघात यावेळी अर्शदीप सिंग, उमरान मलिक, कुलदीप यादव आणि शिवम मावी हे चार गोलंदाज असतील. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात चार मुख्य गोलंदाजांनिशी उतरणार असल्याचे यावेळी दिसत आहे. Team India Playing XI : भारत : शुभमन गिल, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CwB6s9b

No comments:

Post a Comment