Breaking

Sunday, February 5, 2023

याला काय म्हणणार! विमानालाही सोडलं नाही, पान मसाला खाणाऱ्याने काय केले पाहा https://ift.tt/GxTo1Rc

वाराणसी : सध्या विमानात अनेक विचित्र प्रकार घडताना ऐकायला मिळत आहेत. वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या एका विमानात एका प्रवाशाने एअर सिकनेस बॅगमध्ये खाऊन थुंकला. दुसऱ्या एका प्रवाशाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्याचा फोटो ट्विट केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली या बाबत माहिती मिळालेली नाही. मात्र एका प्रवाशाने ट्विट केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.हे प्रकरण वाराणसीतील बाबतपूर विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या क्रमांक SG-202 या विमानात घडले आहे. एक प्रवासी जेव्हा या फ्लाइटमध्ये चढला तेव्हा त्याला दिसले की कोणीतरी एअर सिकनेस बॅगमध्ये पान मसाला खाऊन थुंकलेले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिकनेस बॅग ठेवण्यात आलेली आहे. एखाद्या प्रवाशाला उलटी झाल्यास त्याचा वापर करता यावा या उद्देशाने ती बॅग ठेवण्यात येके. पण इथे कुणीतरी पान मसाला थुंकण्यासाठी या पिशवीचा वापर केला आहे.क्लिक करा आणि वाचा- जेव्हा एका प्रवाशाने ही बॅग पाहिली तेव्हा तिचा फोटो काढून त्याने तो ट्विटरवर टाकला आणि लिहिले की, वाराणसीला फ्लाइट SG-202 मध्ये चढलो आणि पान-गुटख्याने भरलेली एक सिकेस बॅग पाहिली. मला मान्य आहे की लोकांना पान गुटखा खाणे आणि रस्त्यावर थुंकणे आवडते पण त्यांनी विमानाला देखील सोडलेले दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्लिक करा आणि वाचा- विमान कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की प्रवासादरम्यान असे केल्यास प्रवाशांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते किंवा अशा प्रवाशाला दंडही आकारला जाऊ शकतो. सध्या तरी या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली किंवा कसे याबाबत माहिती मिळालेली नाही.क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2NjDVbc

No comments:

Post a Comment