Breaking

Thursday, July 20, 2023

तेलही गेले अन् तूपही गेले; मुदत ठेवीवर जास्तीच्या परताव्याचे आमिष, पावणे चार कोटींना चुना https://ift.tt/4jVBMm8

: इतर बँकापेक्षा आमच्या बँकेमध्ये जास्तीचे व्याजाची रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवून बीड येथील एका मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटीने भूम तालुक्यातील एका ६५ वर्षीय व्यक्तीला मुदत व बचत ठेव स्वरुपात रक्कम गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. मात्र ती रक्कम स्वतःच्या कामासाठी व इतर फायद्यासाठी इतरत्र वापरून त्यांची तब्बल ३ कोटी ७२ लाख १ हजार ४९४ रुपयांची केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ माजली असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकांनी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतच आपल्या ठेवी ठेवाव्यात असे मत अनेक तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. अशी फसवणूक झाल्यामुळे आजपर्यंत करून जमवलेली कमाई गेले असून....तेलही गेले अन् तूपही गेले हाती धुपाटणेच आले...अशी अवस्था संबंधित गुंतवणूकदाराची झाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिता बबन शिंदे (चेअरमन तथा अध्यक्ष), बबन विश्वनाथ शिंदे, मनीषा बबन शिंदे, योगेश कारंडे, अश्विनी सुनिल वांढरे, (सर्व रा. राजीव गांधी चौक, बीड तर) ईट शाखेचे शाखा व्यवस्थापक अशोक गोविंद लावंडे (रा. महिंद्रावाडी ता. पाटोदा), कारकून शिवराज शशिकांत बिरबले (रा. भूम), रोखपाल शंकर भास्कर हाडुळे (रा. ईट ता. भूम), कारकून अमोल नामदेव पवार (रा. घाटनांदुर ता. भूम) यांनी दि. १४ जुलै २०२३ पासून आजपर्यंत अनुराथ बापुराव महाकले (वय ६५ वर्षे, लांजेश्वर ता. भूम) यांची जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांचे जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा ईट येथे मुदत ठेव व बचत ठेव स्वरुपात अस सर्व मिळून ३ कोटी ७२ लाख १ हजार ४९४ रुपये स्विकारले. त्यानंतर त्यांच्या खाजगी कामासाठी व फायद्यासाठी इतर ठिकाणी वापरुन पैशांचा अपहार करुन फसवणूक करुन विश्वासघात केला. या प्रकरणी अनुरथ महाकले यांनी दि.१९ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम- ४०९, ४२०, १२० (ब) सह ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाने संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा नोंदवला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे अनिरुद शेजाळ हे करीत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PAkOKQx

No comments:

Post a Comment