पुणे: आंबेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात भीमाशंकरकडे जाणाऱ्या आहे. तसेच कुशिरे आणि फलोदे गावच्या परिसरात देखील दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या परिसरात पुन्हा माळीनसारखी दुर्घटना घडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भीमाशंकर परिसरात अनेक गावे दरड प्रवण क्षेत्राखाली येतात. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे समोर येत आहे. पोखरी घाटात गेल्या वर्षी याच ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे संपूर्ण मोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. आताही त्याच भागात दरड कोसळल्याने माती रस्त्यावर आली आहेत. भीमाशंकरचा वरचा भाग आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोक राहतात. ती लोक अशीच डोंगराच्या खाली वस्ती करून राहतात. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क फार कमी प्रमाणात असतो. पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस पडतो. नद्या डोंगरावरून वाहत येणारे पाणी ओढे, नद्या तुडूंब भरून वाहतात. मात्र पोखरी घाटात दरड कोसळल्याने घाटातून प्रवास करताना भाविक आणि पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाकडूनही काळजी घेत प्रवास करावा, असे आवाहन घोडेगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी बाहेरचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. त्यावेळी पोखरी घाटातून त्यांना प्रवास करावा लागतो. घाटात दरड कोसळण्याच्या प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवास करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iCrhqVG
No comments:
Post a Comment