नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन यांची देवावरील श्रद्धा अनेकदा पाहायला मिळते. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ते भगवान शंकराची आराधना करतानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मुकेश अंबानी हे शनिवारी मुलगा आकाश अंबानीसोबत सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी मुलासह मंदिरात पूजा केली. मुकेश अंबानी आणि यांनी भगवान शिवाला अभिषेक केला आणि प्रार्थना केली. मंदिराच्या पुजार्याने त्यांना आदरार्थी चंदनाचा टिळा लावला आणि अभिषेक केला. मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष पी.के. लाहिरी आणि सचिव योगेंद्रभाई देसाई यांनी केले.मंदिर ट्रस्टला १.५१ कोटी रुपये केले दानपूजेनंतर मुकेश अंबानी यांनी ट्रस्टला १.५१ कोटी रुपयांची देणगीही दिली. अंबानी कुटुंबाला भगवान शिवाबद्दल खूप आदर आहे. हे कुटुंब आपल्या परंपरांशी जोडले गेले आहे. हे कुटुंब सर्व हिंदू सण उत्साहाने साजरे करतात. आजही संपूर्ण देश महाशिवरात्रीच्या रंगात सजला असताना अंबानी कुटुंबानेही या शुभमुहूर्तावर मंदिरात पूजाअर्चा आणि दान केले. सोमनाथ मंदिरातील विविध छायाचित्रांमध्ये पिता-पुत्र एकमेकांचे हात धरलेले दिसत होते. एका फोटोत, एक पुजारी अंबानींना चंदनाचा टिळा आणि एक शाल भेट देत असल्याचे दिसत आहे. गेल्या वेळी तिरुमलाच्या व्यंकटेश्वर मंदिराला दिली होती भेटगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली होती. तेथे त्यांनी दीड कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत याची वाग्दत्त वधू राधिका मर्चंट आणि रिलायन्स रिटेल लिमिटेडचे संचालक मनोज मोदीही होते. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एकसोमनाथ मंदिर गुजरातमध्ये आहे. हे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की हे मंदिर चंद्रदेवाने बांधले होते. हे मंदिर इतिहासात अनेकदा पाडण्यात आले आणि ते पुन्हा बांधण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tCeZ0on
No comments:
Post a Comment