वाशिम: नागपूरचे संत्रे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत मात्र आता संत्रा हे पीक संपूर्ण विदर्भात घेतलं जातं आहे. पारंपरिक पिकांना फाटा देऊन संत्रा बागेची केलेली लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावाचे अल्पभूधारक शेतकरी पुरुषोत्तम राऊत हे उत्तम नियोजन, अपार कष्ट आणि मिळणाऱ्या योग्य दरामुळे लखपती झाले आहेत.आधी ते आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तुर, हरबरा अशी पीकं घ्यायचे. मात्र त्यांना पारंपारिक शेती करुन हाती काहीच राहत नव्हतं. त्यामुळे त्यांनी संत्रा फळबागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि सात वर्षांपूर्वी आपल्या दोन एकर शेतात जंबेरी या जातीच्या ४५० संत्रा झाडाची २० बाय १२ या पद्धतीने लागवड केली. कमी पाणी असताना सुध्दा उत्तम नियोजन आणि अहोरात्र कष्ट करत संत्र्यांची बाग फुलवली. त्यांनी केलेल्या कष्टामुळे फळबागेने यावर्षी चांगला बहार धरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याकडे धाव घेतली. यावर्षी ७०० रुपये कॅरेट प्रमाणे संत्राचा बगीच्या मागितला. सध्या तोडणी सुरू असून अर्ध्या बागेतून आत्तापर्यंत १५०० कॅरेट संत्रे निघाले आहेत तर यामध्ये एकूण २८०० कॅरेट संत्रा निघेल असा अंदाज आहे. त्यातून जवळपास १९ लाख ६०हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.पुरुषोत्तम राऊत हे तसे अल्पभूधारक शेतकरी आहेत. संत्रा लागवडीपूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची होती. बँकेसह नातेवाईकांचंही डोक्यावर कर्ज होतं. पण संत्रा बाग लागवड केल्यानंतर अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांनी उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी १३ लाख २० हजार रुपयांचं संत्रा विकलं. ज्यातून डोक्यावरचं कर्ज फिटलं आणि त्यांनी आपल्या गावातच एक सुंदर घर सुद्धा बांधलं.मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी देता आलं नाही. तसेच इतर कामामुळे संत्र्याच्या बागेवर पाहिजे तेवढं लक्ष देता आलं नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली. तरीही ३ लाख ४० हजाराचे संत्रे त्यांनी विकले. यावर्षी मात्र खचून न जाता सुरुवातीपासूनच योग्य नियोजन आणि अपार मेहनत केल्यामुळे त्यांना फळ मिळाले आहे.पारंपारिक शेती सोडून बहुवार्षिक असलेल्या फळ पिकांची केलेली लागवड, अपार मेहनत आणि उत्तम नियोजनाने दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील शेतीतूनही लाखोंचे उपन्न घेणाऱ्या राऊत कुटुंबाची ही कहाणी नैराशेच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bJ7Zgu4
No comments:
Post a Comment