Breaking

Tuesday, February 21, 2023

पृथ्वी शॉचे प्रकरण सेल्फीमुळे घडले नाही, सपना गिलचा पहिल्याच मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट https://ift.tt/Vu72hPT

मुंबई : पृथ्वी शॉ आणि सपना गिल प्रकरणात आता एक वेगळे वळण आले आहे. कारण हे प्रकरण सेल्फीवरून सुरु झाले होते, असे समोर आले होते. पण पृथ्वी शॉबरोबर मी सेल्फी काढायला गेलीच नाही, असा मोठा गौप्यस्फोट आता सपनाने केला आहे.सपनाची खास मुलाखत एएनआय या वृत्तसंस्थेने घेतली आहे. यामध्ये सपनाने धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. सपनाने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, " मी पृथ्वी शॉ याच्याबरोबर सेल्फी काढायला गेलीच नाही. मी आणि माझा मित्र आनंदी होतो. माझा मित्र एक व्हिडिओ बनवत होता. पण काही वेळात मी पाहिले तर पृथ्वी आणि त्याचे मित्र माझ्या मित्राला मारत होते. आम्ही कोणालाही मारहाण केली नाही किंवा कोणाकडून पैसेही मागितले नाहीत. पण आमच्यावरच चुकीचे आरोप करण्यात आले आहेत."पृथ्वी शॉ आणि सपना गिल हे प्रकरण सेल्फीपासून सुरु झाले, असे समोर आले होते. सपना पृथ्वीकडे सेल्फी काढण्यासाठी गेली होती. पृथ्वीने सुरुवातीला सपनाला सेल्फी काढायला परवानगी दिली. पण त्यानंतर सपना आणि तिचा मित्र पृथ्वीकडे सेल्फी घेण्यासाठी भुणभुण करत होते. पण पृथ्वीने या गोष्टीस नकार दिला होता, असे समोर आले होते. पण आता सपनाने या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी पृथ्वीकडे सेल्फी काढण्यासाठी गेलीच नव्हती, असे तिने म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही कोणाला मारहाण केली नाही, त्याचबरोबर कोणाकडे पैसेही मागितले नाही, असेही सपनाने म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण हे प्रकरण सेल्फीभोवती फिरत होते. पण सपनाने मात्र ही गोष्ट खरी नसल्याचे सांगितले आहे. सपनाला सोमवारी जामीन मिळाला होता. त्यानंतर सपनाने पृथ्वीने आपला विनयभंग केला, असा आरोप केला होता. त्यानंतर एएनआयला दिलेल्या मुलाखतीत तर सपनाने आपण पृथ्वीकडे सेल्फी मागितलीच नाही उलट त्यांनीच माझ्या मित्राला मारहाण केली, असा गौप्यस्फोट केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xTglrBn

No comments:

Post a Comment