: चाळीसगाव तालुक्यातील बोढरा नियतक्षेत्र परिसरातून विनापरवाना करणाऱ्या दोन जणांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ किलो वजनाचे चंदनाचे लाकूड हस्तगत करण्यात आली असून तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. सलमान खॉ. अबरार खॉ पठाण (वय-३२) आणि शाबीर खॉ अजमेर खॉ पठाण (वय-२४) दोन्ही राहणार कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद असे अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील बोढरा येथील वनपाल व वनरक्षक हे बोढरा जंगली गस्तीवर असतांना दोन जण आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असतांन त्यांच्या जवळील पिशवीत ५ किलो १५० ग्रॅम वजनाचे चंदनाचे लाकूड, लोखंडी कुऱ्हाड, लहान लोखंडी करवत आणि दोन मोबाईल दिसून आले. दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वनविभागाच्या पथकाने सलमान खाँ अबरार खाँ पठाण आणि शाबीर खाँ अजमेर खाँ पठाण या दोघांना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, रहिम तडवी, प्रसाद कुळकर्णी, अशोक मोरे, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वनपाल डी.के. जाधव करीत आहे. चंदनाची तस्करी हे गंभीर प्रकरण असून बोढरा नियतक्षेत्रात चंदन तस्करांची टोळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kUeJxCy
No comments:
Post a Comment