Breaking

Wednesday, February 22, 2023

दिल्ली हादरले! प्रथम शाळकरी मुलीशी मैत्री केली, नंतर अपहरण करून तिला संपवले, कुटुंबीयांना मिळाला कुजलेले शव https://ift.tt/THNmqy8

नवी दिल्ली : दिल्लीतील नागलोई भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. दिल्लीसह अनेक राज्यांत पोलिसांनी छापे टाकल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून मुलीचा कुजलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. बाह्य जिल्ह्याचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. राजधानी पार्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आपल्या ११ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. ही मुलगी शाळेत गेली होती, मात्र, ती घरी परत आली नाही.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तसेच अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिल्लीशिवाय पंजाब आणि मध्य प्रदेशातही छापे टाकण्यात आले. या प्रकरणी रोहित उर्फ विनोद याला अटक करण्यात आली. तो पश्चिम विहार झोपडपट्टीतील रहिवासी आहे. आरोपीने सुरुवातीला मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केलाआरोपीने पोलिसांना सांगितले की, तो या मुलीला ९ फेब्रुवारीला भेटला होता. त्याने मुलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. एफएसएल आणि क्राईम टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संजय गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे शवविच्छेदनानंतर होणार स्पष्टबुधवारी मृत मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे कळेल. यापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, नंतर खुनाचे कलमही जोडण्यात आले. मुलीची हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सतत इकडे तिकडे पळत असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yqSOKd9

No comments:

Post a Comment