Breaking

Sunday, February 26, 2023

T20 Women's World Cup: ऑस्ट्रेलियाचा धमाका, सहाव्यांदा जिंकले विश्वविजेतेपद, द. आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव https://ift.tt/2ZJUz1M

केपटाऊन : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन महिला संघ विक्रमी सहाव्यांदा विश्वविजेता बनला आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मॅग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने बेथ मुनीच्या ७४ धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या.ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावाच करू शकला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने हा सामना १९ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. अशा प्रकारे अपराजित राहून त्यांनी विश्वचषक ट्रॉफीसह स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेचा शेवट केला.बेथ मुनीने केली कमाल ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर बेथ मुनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सामना विजेता ठरली. आपला दमदार फॉर्म कायम ठेवत तिने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५३ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान तिने ९ चौकार आणि १ शानदार षटकारही लगावला. मुनीशिवाय यष्टिरक्षक फलंदाज अॅलिसा हिलीनेही १८ धावांचे योगदान दिले तर अॅशले गार्डनरने २९ धावांचे मोलाचे योगदान दिले. याशिवाय ग्रास हॅरिस आणि कॅप्टन मॅग लॅनिंगने १०-१० धावांचे योगदान दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EKZJ5LH

No comments:

Post a Comment