Breaking

Thursday, March 2, 2023

भरधाव ट्रकने बाईकला चिरडले, दाम्पत्याचा जागीच करुण अंत, दोन वर्षांचा चिमुकला बचावला https://ift.tt/0lRdxaf

अमरावती : बाईक आणि ट्रकच्या अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला सुदैवाने बचावला. एका भरधाव ट्रकने समोरून जात असलेल्या दुचाकीला चिरडल्याने हा अपघात झाला. अमरावती जिल्ह्यात देवरी फाट्याजवळ असलेल्या तेलाई नाल्याजवळ ही घटना घडली.बाईक आणि ट्रकच्या अपघातात पती पत्नी दोघेही जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात देवरी फाट्याजवळ घडली. सुदैवाने त्यांचा दोन वर्षीय चिमुकला या अपघातातून सुखरुप बचावला आहे. दाम्पत्याच्या मृत्यूबद्दल मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.विजय अण्णाजी शिंदे (वय २८ वर्ष), व ऋतुजा विजय शिंदे (वय २४ वर्ष, रा. जळका जगताप, ता. चांदुर रेल्वे जि. अमरावती) असे अपघातात ठार झालेल्या पती आणि पत्नीची नावे आहेत. तर देवांशु विजय शिंदे (वय २ वर्ष) हा या दाम्पत्याचा चिमुकला मुलगा जखमी असल्याची माहिती आहे.विजय शिंदे त्यांची पत्नी ऋतुजा आणि चिमुकला मुलगा देवांशु हे दुचाकी क्र. एम एच २७, ए डब्ल्यू ७४०१ ने जळका जगताप येथून देवरी येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते शिराळा मार्गे देवरी येथे जात असताना त्यांच्या मागून कुटार घेऊन जाणारा भरधाव ट्रक क्र. एम एच २७, बीएक्स ५०६६ अनियंत्रित झाला आणि त्याने दुचाकीला जबर धडक दिल्याची माहिती आहे.या अपघातामध्ये विजय आणि ऋतुजा शिंदे हे दाम्पत्य जागीच ठार झाले तर चिमुकला देवांशु जखमी झाला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तातडीने माहुली जहागीर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच माहुली जहागीर पोलीस स्टेशन पीएसओ मिलिंद सरकटे, ए एस आय टोकमुरके, ए एस आय अघाडे, हे कॉ धर्माळे, पो कॉ विनोद वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले.जखमी देवांशुला जवळ घेऊन दोन्ही मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले, तर देवांशुला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त शिंदे यांच्या कुटुंबियांना कळताच रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती माहुली जहागीर पोलिसांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/agCpDjK

No comments:

Post a Comment