चितौडगड: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या आजारी पतीपासून सुटका मिळवण्यासाठी एका पत्नीने अत्यंत संतापजनक काम केलं आहे. या पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. ही व्यक्ती नेहमी आजारी असायची त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असेल असं नातेवाईकांना वाटलं होतं. मात्र, त्या व्यक्तीच्या शरीरावर जखमांचा खुणा होत्या, त्यामुळे त्याच्या भावाच्या मनात संशय आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पत्नीकडे चौकशी करताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील असल्याची माहिती आहे. ३१ जानेवारीला कपासन पोलीस स्टेशन हद्दीतील क्या कला गावात राहणाऱ्या बाबुद्दीनचा मृत्यू झाला होता. बाबाबुद्दी दोन दिवसांपासून आजारी होते. त्याच आजारातून त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांना वाटलं आणि त्यांनी त्यांचा मृतदेग मूळगावी बोराणा येथे नेला. तिथे बाबुद्दीनच्या मृतदेहावरील जखमा पाहून त्यांच्या भाऊ इरफानला संशय आला आणि त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी याबाबत गुप्त पद्धतीने तपास केला. तेव्हा त्यांना कळालं की मृत बाबुद्दीन आणि त्याची पत्नी शाहरुन यांच्यात वारंवार भांडण आणि हाणामारी होत असतं. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी तिच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली. तेव्हा त्यांना सारी हकिगत कळाली. कॉल डिटेल्सच्या आधारे बाबुद्दीनची पत्नी आणि भिलवाडा येथील रहिवासी ओम प्रकाश साळवी यांच्यातील संबंध हे संशयास्पद आढळले. त्यावरून पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली. अखेर पोलिसांपुढे या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.या दोघांनी मिळून आजारी बाबुद्दीनचं तोंड उशीने दाबून त्याची हत्या केली. या घटनेत त्यांनी इतर दोन साथीदारांचीही मदत घेतली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी शाहरुन आणि तिचा प्रियकर ओम प्रकाश यांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस आणखी दोघांचा शोध घेत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CEJwdGj
No comments:
Post a Comment