Breaking

Wednesday, March 1, 2023

कोण आहेत स्वामी नित्यानंद; विजयप्रियाने भारतावर नेमके कोणते आरोप केले? https://ift.tt/5dbsuBJ

नवी दिल्ली: भारतात लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अशी ओळख असलेले पुन्हा एकदा आपल्या नव्या प्रचारामुळे टिकेचा विषय ठरले आहेत. स्वामी नित्यानंद यांनी दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद ईथे एका बेटा जवळील जागा विकत घेतली आहे. त्यांनी त्या बेटाचे नाव ठेवले असून, त्याला स्वत:चा एक नवीन देश म्हणून घोषित केले आहे. आता नित्यानंद यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्यांच्या देशातून शिष्टमंडळ पाठवल्याचा दावा केला आहे. कैलासातून साध्वी जिनेवामध्ये पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रात भाग घेताना दिसत आहेत.नित्यानंद यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून याचा प्रचार केला आहे. तर कैलासाच्या वेरिफाईड फेसबूक अकाउंटनुसार विजयप्रिया या कथित देशाच्या स्थायी राजदूत आहेत. विजयप्रिया यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी शहर हे त्यांचे निवासस्थान असल्याचं सांगितलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार विजयप्रिया नित्यानंदांच्या कथित देशात डिप्लोमॅट आहेत.विजयप्रियासह आणखी पाच महिलांचा समावेश२२ फेब्रुवारी रोजी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात संयुक्त राष्ट्र संघाने १९ व्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवर एक परिषद आयोजित केली होती. यामध्ये विजयप्रियासह, कथित देशातील कैलासा, कैलासा लॉस एंजेलिस प्रमुख मुक्तिका आनंद, कैलासा सेंट लुईस प्रमुख सोना कामत, कैलासा यूके प्रमुख नित्या आत्मदायकी, कैलास फ्रान्स प्रमुख नित्या वेंकटेशानंद आणि कैलासा स्लोव्हेनियन मदर प्रियंपारा नित्यानंद या इतर पाच महिला होत्या.भारतावर छळाचा आरोपमीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयप्रिया यांनी या कॉन्फरन्समध्ये भारताविरोधात चुकीची वक्तव्य केली आहेत. विजयप्रिया यांनी भारताने त्यांचे गुरु नित्यानंद यांचा छळ केला आहे, असा आरोप केला आहे. विजयप्रिया यांनी संयुक्त राष्ट्रांना विचारले की, नित्यानंद आणि कैलासातील २० लाख हिंदू स्थलांतरित लोकांचा छळ थांबवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात. नित्यानंद यांच्यावर भारतात साध्वीवरील बलात्कारासह अनेक खटले सुरू आहेत. तर सध्या नित्यानंद देशातून फरार झाला आहे.अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या भेटीगाठीकैलासाच्या वेबसाईटनुसार, विजयप्रिया या काल्पनिक देशाच्या वतीने जगातील इतर संस्थांशी करारही करू शकतात. विजयप्रिया यांनी संयुक्त राष्ट्रातील अनेक देशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि फोटोही शेअर केले. मीडियी रिपोर्टनुसार, एका व्हिडिओमध्ये विजयप्रिया काही अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत करार करताना दिसत आहेत. त्यांचा दावा आहे की कैलासाने जगातील अनेक देशांमध्ये आपले दूतावास आणि एनजीओ सुरु केले आहेत.कोण आहे बाबा नित्यानंद?स्वघोषित बाबा स्वामी नित्यानंद यांचं खर नाव राजशेखरन आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी लहानपणीच योग, वेद, तंत्र, शैव दर्शन इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला होता. त्यांनी रामकृष्ण मठमधून शिक्षण पुर्ण केल आहे. नित्यानंद यांचा जन्म तारखेवरुनही काही वाद आहेत. २००३ मध्ये अमेरिकी व्हिजा घेताना त्यांनी १३ मार्च १९७७ सांगितली होती. तर कर्नाटक उच्च न्यायलयात दिल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची जन्म तारीख १ जेनवरी १९७८ सांगितली आहे.कधी आणि कसे बनले मठाधीश?नित्यानंद यांनी मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. मात्र, या पदव्या सुध्दा खोट्या असल्याचं बोललं जातं. २००० मध्ये त्यांनी कर्नाटकाच्या बिदादीमध्ये ज्ञानपिठाची स्थापणा केली असून तिथे योग, मेडिटेशन इत्यादी फिटनेस संदर्भातील कोर्स चालवले जातात.बलात्काराचे आरोप२०१० दक्षिण भारतातील एका मीडिया चॅनलने नित्यानंद यांचा एक अश्लील विडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ते एका अभिनेत्रीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करत त्याने व्हिडिओला खोटा म्हटले आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. नित्यानंदचे अनेक फॉलोअर्स आहेत, ज्यात कोट्याधीशांची कमतरता नाही. असाही दावा केला जातो की, श्रीमंत भक्तांच्या मदतीने नित्यानंद भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hXATpwP

No comments:

Post a Comment