Breaking

Friday, March 24, 2023

तुम्ही माझी कॉपी करू नका, मी तर बैल आहे, बेडकाने बैलासारखं होऊ नये; बिचुकलेंचा टोला https://ift.tt/DLIJrZK

सातारा : बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचकुले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात.आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिल्यामळे ते चर्चेच आले आहेत. राज्य शासनाने महिलांसाठी एसटी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत जाहीर केली. या निर्णयाचे स्वागत करत असताना बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे. यांनी महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिल्याबद्दल त्याबाबत सरकारचं अभिनंदन केले आहे. मात्र, महिलांना सवलतीच्या दरात नुसते प्रवासाला पाठवून काही उपयोगाचे नाही, असे बिचुकले यांना वाटते. महिला वर्गाची खरी गरज ही स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची आहे. या सिलेंडरला १२०० रुपये द्यावे लागतात. हा माझ्या माता-भगिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संपूर्ण घर चालवणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी सिलेंडरवर ५० टक्क्यांची सवलत द्या, अशी मागणी बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.महिला मुख्यमंत्री व्हावी हा मुद्दा माझा- बिचुकलेबिचुकले म्हणाले की, पुढील मुख्यमंत्री ही महिला असेल ही भूमिका मी मांडली होती. लेडी मुख्यमंत्र्याची भाषाच अभिजित बिचुकलेने सुरू केली. मात्र, आता काही लोक लेडी मुख्यमंत्र्याचा मुद्दा पुढे आणतात. आता माझी कॉपी इतर लोकं करायला लागले आहेत. माझी कॉपी कोणी करू नये. मी बैल आहे. बेडकानं बैल होऊ नये, असा खोचक टोला बिचुकलेंनी लागावला आहे.सिलेंडरच्या मुदद्यावर अनेक महिला संघटना आंदोलन करण्यासाठी सज्ज होत आहेत, याकडेही बिचुकले यांनी लक्ष वेधले आहे. अभिजित बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपले मुद्दे मांडले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dH5y6Rz

No comments:

Post a Comment