Breaking

Saturday, March 25, 2023

सकाळी ऑफिसला गेला, काहीच वेळात घरमालकाचा फोन, तुझ्या पत्नीने... पती घरी येऊन पाहतो तर... https://ift.tt/ZhgVPU7

धनबाद: झारखंडमधील धनबादमध्ये एका महिलेने किरकोळ वादातून आत्महत्या केली आहे. हे प्रकरण माला जिल्ह्यातील गोशाळा ओपी अंतर्गत गौशाळा बाजार येथे आहे. जेथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या स्नेहा कुमारी या नवविवाहित महिलेने गळफास लावून आपले जीवन संपवले. स्नेहा कुमारी तिच्या पतीकडे तिच्या माहेरी जमशेदपूरला जाण्याचा आग्रह करत होती. मात्र, पतीने तिला माहेरच्या घरी जाण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतर रागाच्या भरात नवविवाहित महिलेने टोकाचं निर्णय घेत घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेवेळी विवाहित महिला घरी एकटीच होती. पती ड्युटीवर गेल्यानंतर तिने हे पाऊल उचलले. घरमालकाने या घटनेची माहिती महिलेचा पती सतीश पाठक यांना दिली. त्यानंतर पती तात्काळ घरी पोहोचला. घरी आल्यावर त्याने बघितलं तर दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर घराचा कडीकोयंडा तोडून आत शिरला आणि जेव्हा तो दरवाजा उघडून खोलीत पोहोचला तेव्हा त्याची पत्नी फासावर लटकलेली दिसली. त्यानंतर या घटनेची माहिती पतीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवला. पतीकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.स्नेहा कुमारीने १७ एप्रिल २०२१ रोजी उत्तर प्रदेशातील सतीश पाठक याच्याशी प्रेमविवाह केला होता. मृतकाचा पती सतीश पाठक यांनी सांगितले की, पत्नी स्नेहा कुमारी दोन दिवसांपासून जमशेदपूरला जाण्याचा आग्रह करत होती. आता पैसे नाहीत, काही दिवसांनी माहेरी जा, असे त्याने पत्नीला सांगितले होते, परंतु ती जिद्दीला पेटली होती.दररोज प्रमाणे सतीश पाठक हे आपल्या कामावर गेले असता अचानक त्यांना घरमालकाचा फोन आला. त्यानंतर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. पतीने सांगितले की, १७ एप्रिल २०२१ रोजी स्नेहासोबत प्रेमविवाह केला होता. पत्नीचे माहेर जमशेदपूर आहे. तिला माहेरी जाण्यासाठी नकार दिल्याने तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dUFaOA5

No comments:

Post a Comment