नवी दिल्ली : आशिया चषक जर पाकिस्तानात झाला तर भारत खेळणार नाही, असे बीसीसीआयने पूर्वीच म्हटले होते. पण आता ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असली तरी भारत यामध्ये खेळणार असल्याचेही आता समोर आले आहे. त्यामुळे आशिया चषकाचा तिढा आता सुटलेला आहे.पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार असेल तर भारता तिथे जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर जर भारत पाकिस्तामध्ये खेळण्यास येणार नसेल तर आम्हीदेखील त्यांच्या देशात वनडे विश्वचषक खेळायला जाणार नाही, असा धमकी वजा इशारा पाकिस्तानने दिला होता. त्यांनतरही बीसीसीआयला आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आशिया चषकाचे ठिकाण बदलण्यावर जोरदार चर्चा सुरु होती. पाकिस्तान सोडून अन्य ठिकाणी आशिया चषकाचे सामने झाले तर भारताने खेळण्यास होकार दिला होता. त्यामुळे आशिया चषक आता दुबई किंवा श्रीलंकेत खेळवला जाऊ शकतो, असे म्हटले जात होते. पण या स्पर्धेचे यजमानपद सोडण्यास मात्र पाकिस्तानचा नकार तर होताच, पण ही स्पर्धा पाकिस्तानबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आता त्यांचे म्हणणे खरे झाले आहे.आशिया चषक स्पर्धा आता पाकिस्तान होणार असून त्याचे यजमानपदही त्यांच्याकडे असेल. त्याचबरोबर भारत हा या स्पर्धेत खेळणार आहे. पण भारत हा पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचेही समोर येत आहे. भारत जर पाकिस्तानात गेला नाही तर स्पर्धा कशी होणार, हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण याचे उत्तर आता समोर आले आहे. स्पर्धा पाकिस्तानात होत असली तरी भारताचे सामने हे अन्य ठिकाणी होतील. त्यामुळे आशिया चषकाचे बहुतांशी सामने पाकिस्तानात होणार असले तरी भारत मात्र तिथे न जाता या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता अशा पद्धतीने पार पाडणार आहे.भारताचे सामने कुठे खेळवायचे, हे मात्र अजून ठरलेले नाही. भारताच्या सामन्यांसाठी दुबई, श्रीलंका आणि ओमान असे पर्याय समोर ठेवण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rIGU6RV
No comments:
Post a Comment