Breaking

Thursday, March 23, 2023

तोंडातून रक्तस्त्राव, गालावर खरचटलेलं; तपोवन एक्स्प्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह https://ift.tt/Zvn4r79

नांदेड: नांदेड रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेचा रेल्वेच्या शौचालयात मृतदेह आढळून आला आहे. नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस (१७६१८) रेल्वे दररोज धावते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास तपोवन एक्सप्रेस धर्माबादहून नांदेड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी ही रेल्वे प्लॅट फॉर्मवर उभी होती. त्यावेळी रेल्वेच्या डी-८ या कोचमधील शौचालयामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. त्या महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होतं होता. तसेच, महिलेच्या उजव्या गालावर खरचटलेले होते. महिलेच्या शरीरावर इतर जखमा देखील आढळून आल्या होत्या. मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मयत महिला ही ३० ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे. या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य काही या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपर्यंत मयत महिलेची ओळख काही पटली नाहीये. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या महिलेचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, रेल्वे डब्यातील शौचालयामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने रेल्वेत एकच खळबळ उडाली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5w37jYT

No comments:

Post a Comment