Breaking

Saturday, March 25, 2023

'उद्धव ठाकरे गद्दारांचा समाचार घेणार'; मालेगावात संजय राऊतांचा दादा भुसेंवर निशाणा https://ift.tt/LAHcJbQ

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांनी गद्दारी केली असून, राज्याच्या मातीत गद्दारीला थारा नाही. त्यांचाच समाचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेत घेतील, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना टोला लगावला.शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (दि. २६) मालेगावात सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत शुक्रवारी मालेगावात दाखल झाले. शनिवारी (दि. २५) खासदार राऊत यांच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी राऊत बोलत होते.याप्रसंगी खासदार विनायक राऊत, उपनेते डॉ. अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर आदी उपस्थित होते. राऊत म्हणाले, शिक्षण व सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे व त्यांच्या कुटूंबात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता होती. तीच क्षमता, ऊर्जा शिवसेना उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यात आहे. त्यामुळे डॉ. हिरेंनी आता राज्याकडे लक्ष दिले पाहिजे असा सल्ला राऊत यांनी दिला.‘पालकमंत्र्यांची ही शेवटची निवडणूक’येथील लोकप्रतिनिधींना शिवसेनेने सर्व काही दिले. परंतु, त्यांनी खोक्याच्या आमिषाने गद्दारी केली. राज्याच्या मातीमध्ये गद्दारीला आणि बेईमानीला अजिबात थारा नाही. मागील काही महिन्यांत राज्याच्या या मातीत तात्पुरते भांगेचे पीक आले. परंतु, राज्यातील ही जनता भांगेचे हे पीक उपटून फेकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पालकमंत्र्यांची ही शेवटची निवडणूक असून, त्यांचा समाचार घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावी येत असल्याचेही ते म्हणाले. प्रमोद शुक्ला यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास जिल्हा समन्वयक पवन ठाकरे, नथुबाबा जगताप, अशोक निकम, संजय निकम, विष्णू पवार, तालुकाप्रमुख रामा मिस्तरी, प्रकाश वाघ, डॉ. उज्जैन इंगळे, सुभाष सूर्यवंशी, हिरालाल नरवडे, बळीराम देसले, शेखर पगार, आनंदसिंग ठोके, नंदलाल शिरोळे, जगन्नाथ हिरे, गणेश खैरनार, संजय हिरे, महेश पवार, विनोद बोरसे, विठोबा छरंग, प्रवीण पगार, महेंद्र देवरे उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s0nlvBO

No comments:

Post a Comment