Breaking

Sunday, March 26, 2023

मुंबई इंडियन्सने ट्रॉफी जिंकली रे...! WPL च्या अंतिम फेरीत दिल्लीवर मिळवला दणदणीत विजय https://ift.tt/cNtTYp3

नवी मुंबई: महिला प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्याच सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने दणदणीत बाजी मारत आपली विजयी पताका फडकावली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा संघावर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह त्यांनी या लीगमधील पहिले विजेतेपद पटकावण्याचा मानदेखील मिळवला. मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या डावाची शानदार सुरुवात झाली. पहिल्याच षटकात मुंबईच्या सलामीवीरांनी ९ धावा कुटल्या. केर आणि स्किव्हरने १९ व्या षटकात दमदार फलंदाजी केली. १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्किव्हरने चौकार मारत अर्धशतक झळकावले. तर केरने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दणदणीत २ चौकार लगावले आणि संघाची धावसंख्या १२७ वर आणली. त्यानंतर मुंबईला ६ चेंडूत ५ धावांची आवश्यकता होती. स्किव्हरने तिसऱ्याच चेंडूवर विजयी चौकार लगावत मुंबईला जेतेपद पटकावून दिले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये २७ धावा करत २ विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि नटली स्किव्हर ब्रँट यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. दिल्लीकडून खूप किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली. पण हरमन आणि स्किव्हरने संधी मिळताच आपली फटकेबाजी चालूच ठेवली. शेवटची ४ षटके शिल्लक असताना हरमनप्रीत कौर दुर्दैवीरित्या धावबाद झाली. हरमनने ३९ चेंडूत ५ चौकार लगावत ३७ धावा केल्या.स्किव्हर ब्रँट मुंबईच्या विजयाची हिरो अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयाची हिरो स्किव्हर ब्रंट होती, जी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरली आणि शेवटपर्यंत मैदानात तळ टोकून होती. तिने ६० धावांची मॅच विनिंग इनिंग खेळली. ५५ चेंडूंचा सामना करत तिने दणदणीत ७ चौकार मारले. दिल्लीच्या संघाकडून जोनासेन आणि राधा यादव, कॅप्सी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. दिल्ली कॅपिटल्सने अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण दिल्लीच्या संघाची सुरुवात काही चांगली झाली नाही. त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या. १०० धावांच्या आत त्यांनी ९ विकेट्स गमावल्या होत्या. पण शिखा पांडे आणि राधा यादव यांच्या ५० अधिक धावांच्या भागीदारीने दिल्लीच्या संघाला १३१ धावांचा आकडा गाठण्यात मदत केली. पण मुंबईने हे आव्हान खोडून काढत मोठा इतिहास रचला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YOUhC7S

No comments:

Post a Comment