नवी दिल्ली : राग आल्यावर एक खेळाडू नेमकं काय करू, याचा प्रत्यय चाहत्यांना काही तासांपूर्वीच आला आहे. कारण जेव्हा एका फलंदाजाला बाद देण्यात आलं तेव्हा तो चांगलाच रागावला होता. रागाच्या भरात त्याने बॅट आणि हेल्मेट फेकून दिलं. ग्लोव्ह्जला लाथेने उडवलं. या खेळाडूला राग अनावर झाल्याचे पाहायला मिळले होते. सध्या या खेळाडूचा व्हिडिओ जगभारात चांगलाच व्हायरल झाला आहे.न्यू नॉरफोक आणि क्लेरेमॉन्ट यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात क्रिकेटच्या मैदानावर ही घटना घडली. या सामन्यात क्लेरेमॉन्टचा फलंदाज जॅरॉड काय याला मांकडिंग करत नॉरफोकच्या गोलंदाजाने धावबाद केले. चेंडू टाकण्यापूर्वी काय हा क्रीजमधून बाहेर पडला होता. त्यानंतर गोलंदाजाने बेल्स विखुरले आणि अंपायरकडे जोरात अपील केले. त्यानंतर मैदानातील पंचांनी थोडा वेळ घेतला, पण त्यानंतर त्यांनी फलंदाजाला बाद देण्याचा निर्णय घेतला.पंचाचा निर्णय क्लेरेमॉन्टच्या फलंदाजाला पटला नाही आणि त्याने पॅव्हेलियनमध्ये जाण्यापूर्वी त्याचे हेल्मेट आणि बॅट जोरात हवेत फेकले. यानंतर कायचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि त्याने ग्लोव्हज काढून हवेत फेकले आणि जोरात लाथ मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून फलंदाजाची ही वृत्ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.मांकडिंगवर बाद झाल्यावर राग व्यक्त करणे ही फलंदाजांची जुनी सवय आहे. मांकडिंगमधून बाद होणे फलंदाजांना नेहमीच आवडत नाही. कारण एकही चेंडू न खेळता त्या फलंदाजाला बाद व्हावे लागते. त्यामुळे जर एखादा फलंदाज मांकडिंग झाला तर तो बहुतांशी रागाच्या भरात असल्याचे पाहायला मिळते. पण मेरीलेबोन क्रिकेट क्लब मांकडिंगला रनआउट म्हणून दर्जा दिला आहे आणि नियमांनुसार खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानले जात नाही. त्यामुळे मांकडिंग करणे हे क्रिकेटच्या मैदानात नक्कीच चुकीचे नाही आणि त्याला रन आऊटचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात फलंदाज अपील करू शकत नाही. यापूर्वी आयपीएलमध्ये आर. अश्विनने काही वेळा मांकडिंग केल्याचे सर्वांनीच पाहिले होते आणि या घटनेनंतर त्याची चाहत्यांना आठवण आल्यावाचून राहणार नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jQhZHGI
No comments:
Post a Comment