Breaking

Monday, March 27, 2023

दिव्याखालीच अंधार! मानवाधिकार आयोगात तब्बल २० हजार ७३७ प्रकरणे प्रलंबित https://ift.tt/zPvo3Zy

मुंबई : न्याय मागण्यासाठी नागरिक मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतात. मात्र तिथेही दिव्याखाली अंधार आहे. माहितीचा अधिकारांतर्गत आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० या वर्षी एकूण २१ हजार ८२० प्रकरणे दाखल झाली असून, आयोगाने यापैकी एकूण एक हजार ८३ प्रकरणे निकाली काढल्यानंतरही २० हजार ७३७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील फक्त १५ प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय लागला आहे.आयोगाने गेल्या काही वर्षांत किती तक्रारींचा निपटारा केला, याची माहिती घेण्यासाठी ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे सदस्य ॲड. कार्तिक जानी यांना माहिती अधिकारात अर्ज केला होता. आयोगाने दिलेल्या उत्तरात सन २००१पासूनची आपल्या संकेतस्थळावरील माहिती उपलब्ध केली आहे. २०२०पर्यंतच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत आयोगाकडून एकूण १५१ प्रकरणांमध्येच नागरिकांना दिलासा मिळाला आहे.सन २०१४नंतर मानवी हक्क उल्लंघनाच्या तक्रारींचा आलेख वाढू लागला असल्याचे आयोगाच्या आकडेवारीनुसार दिसून येते. मात्र त्या तुलनेत या तक्रारींचा निपटारा लागण्याचा वेग खूपच मंद आहे. २०१४नंतर तक्रारींची संख्या २० ते २५ हजारांपर्यंत असून त्या सुटण्याचे प्रमाण १३ ते ६८ इतके आहे.दरम्यान, आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आयोगात एकूण ५१ टक्के कर्मचारी पदे रिक्त आहेत. एकूण ५४ पदांपैकी २६ पदे भरण्यात आली असून, २८ पदे रिक्त आहेत. ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे अध्यक्ष जितेंद्र घाडगे यांच्या मते, ‘कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के रिक्त जागांमुळे आयोगाच्या कामकाजाचा वेग मंदावत आहे. संपूर्ण राज्यासाठी फक्त तीन मानवाधिकार आयोग कार्यालये असल्यामुळे प्रलंबित प्रकरणाची संख्या वाढत जात आहे. राज्य सरकारने तातडीने सर्व रिक्त पदे भरावीत आणि कार्यालयांची संख्या दुप्पट करावी. त्यामुळे राज्यातील मानवाधिकार उल्लंघनाच्या सर्व पीडितांना न्याय मिळेल.’खोट्या तक्रारी येतात का?‘आयोगाने सन २००१पासूनची आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. ती पाहिली तर तक्रारी सुटण्याचे प्रमाण कमी असले तरी बारकाईने पाहिले तर २०२०मध्ये १५ व गेल्या पाच वर्षांत फक्त १५१ प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या बाजूने निर्णय लागला आहे. याचा अर्थ लोक खोट्या तक्रारी अधिक करतात का, असा संशय घेण्यास जागा आहे’, अशी शंका घाडगे यांनी व्यक्त केली आहे.आयोगात कर्मचारी अपुरे- मंजूर पदसंख्या : ५४- कार्यरत पदे : २६- रिक्त पदे : २८वर्ष तक्रारी निपटारा दिलासा२०१४ २०२२५ १७६१ १५२०१५ २४२६५ ४०९८ ११२०१६ २५८२५ ९६६८ ३८२०१७ २०७४२ ५१८७ ८७२०१८ २२३२५ ५३६८ ४१२०१९ २१६१६ ३५५९ ५७२०२० २१८२० १०८३ १५


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/N8siT03

No comments:

Post a Comment