धाराशिव : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक संतापजनक घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे. घराबाहेर खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेऊन तिचा विनयभंग केल्याची आणि हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणावर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुळजापूर पोलीस स्टेशनकडून याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तिच्या मैत्रिणीसोबत घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी ३३ वर्षीय नराधमाने घरातील एका खोलीत घेऊन जाऊन अल्पवयीन मुलीस लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसंच या कृत्याचा व्हिडिओही चित्रित केला. सदरची घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर मुलीच्या आईने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गावातील ३३ वर्षीय तरुणाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४, ३५४ (अ ), ३५४ (ब ) पोस्को अॅक्ट (८),(१०),(१२),(१४),(१५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मंजुळे हे करत आहेत.दरम्यान, पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करतात. मात्र तरीही अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या घटना कमी करण्यासाठी आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C2D5eMu
No comments:
Post a Comment