म. टा. प्रतिनिधी, पुणे : नागरिकांना आता वाहन चालविण्याच्या परवान्याचे (लायसन्स) नूतनीकरण, लायसन्सवरील नाव, पत्ता व जन्मतारीख बदलणे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागणार नाही. परिवहन विभागाने सात सेवा नव्याने ‘फेसलेस’ केल्याने सर्व कागदपत्रे घेऊन आरटीओमध्ये मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरताना सर्व माहिती व्यवस्थित भरल्यास दोन दिवसांत त्यांच्या अर्जावर कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात आले आहे.केंद्र सरकारने परिवहन विभागाकडून मिळणाऱ्या ५८ सेवा या ‘फेसलेस’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करून सेवा देण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार राज्यात परिवहन विभागाने आतापर्यंत १९ सेवा ‘फेसलेस’ केल्या होत्या. त्यात आता नव्याने सात सेवा ‘फेसलेस’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असा करावा लागेल अर्जअर्जदाराला या फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डला मोबाइल क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे. ‘परिवहन’ या वेबसाइटवर या सेवेचा लाभ घेताना आधार क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर अर्जदाराने दिलेली माहिती व आधारची माहिती तपासून पाहिली जाईल. ही माहिती जुळल्यास पुढे अर्ज करणे शक्य होईल. त्यानुसार अर्जदाराला सात ‘फेसलेस’ सेवांचा लाभ घेता येणार आहे. नागरिक या सेवेसाठी कुठनही अर्ज करू शकणार आहे. त्या अर्जदाराला आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्ज मंजूर झाल्यास लायसन हे अर्जदाराला पोस्टाने पाठविले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.अर्जांचा दोन दिवसांत निपटारापरिवहन विभागाने सुरू केलेल्या ‘फेसलेस’ या २६ सेवांमध्ये अर्ज आल्यास दोन दिवसांत माहितीची खातरजमा करून त्याचा निपटारा करावा, अशा सूचना परिवहन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित राहणाऱ्या अर्जांचा आढावा स्वतंत्रपणे बैठकीत घेण्यात येईल, अशा सूचनाही विभागाने दिल्या आहेत. या सेवा झाल्या ‘फेसलेस’शिकाऊ वाहनपरवाना, लायसनवरील पत्ता बदलणे, जन्मतारीख बदलणे, लायसनचे नूतनीकरण, लायसन हरविले असल्यास दुय्यम प्रत काढणे, वाहन हस्तांतरण करणे, कर्ज बोजा उतरवणे, हरविलेल्या आरसीची (वाहन नोंदणी क्रमांक ) दुय्यम प्रत काढणे अशा सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eJyb9z8
No comments:
Post a Comment