सोलापूर: सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आपलं जीवन संपवत एका महिलेने टोकाचं पाऊल उचलले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केले जात आहे. कविता कल्याणम या विवाहितेने प्रियकराच्या जाचाला कंटाळून ६ मार्चच्या पहाटे राहत्या घरी आत्महत्या केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६ मार्च रोजी रात्री उशीरा प्रियकर संजय राठोड (विजय ब्रम्हनाथ नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.प्रियकर प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हतादोन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या मृत्यूने झाला आहे. दोघांमधलं प्रेमप्रकरण संपुष्टात आलं होतं. मात्र, त्यानंतरही प्रियकर संदीप राठोड हा विवाहित प्रेयसीची पाठ सोडत नव्हता. त्यामुळे विवाहित प्रेयसीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. ५ मार्चला संदीप राठोड हा कविताच्या घरी मध्यरात्री आला. बराचवेळ दार ठोठावत होता. कविताने दार उघडले नाही. तरी तो दार ठोठावत राहिला, अखेर तिने दार उघडलं. संदीप घरात आला आणि कविताला बेदम मारहाण करू लागला. मला सोडू नकोस असे सांगून तो रात्री निघून गेला. पण, ६ मार्चच्या पहाटे तिने स्वतःच्या साडीने गळफास घेत आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं, अशी फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.पती तामिळनाडूला कामानिमित्त गेला होता, त्यावेळी प्रेमसंबंध जुळलेकविताचा पती कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर रोजगाराच्या शोधात तामिळनाडू येथे गेला होता. त्यावेळी कविताला एकटं सासरी सोडले होते. शेजारी राहणाऱ्या संदीप राठोडसोबत कविताचे प्रेमसंबंध जुळले होते. गेल्या दोन वर्षांपासून कविताचे संदीपसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, सदरची बाब कविता कल्याणमच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत असं पुन्हा होऊ नये, अशी ताकीद दिली होती.कविताच्या आईने देखील समज दिली होती. त्यानंतर दोघांतील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. त्यानंतर कविता ही सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहावयास आली होती. मात्र, प्रियकर संदीप राठोड हा कविता कल्याणमची पाठ सोडत नव्हता. शेवटी कविताने जीवनयात्राच संपवली आहे. कविताला ११ वर्षाचा मुलगा देखील आहे. आईविना तो पोरका झाल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते.प्रियकरविरोधात गुन्हा दाखलसंदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरातमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती कविता कल्याणम यांच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. एमआयडीसी पोलिसानी खोलात जाऊन तपास करत गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Q2SKD5W
No comments:
Post a Comment