
नवी दिल्ली : मोहम्मद शमीच्या वादात आता कॉंग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनी उडी घेतली आहे. यापूर्वी शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला त्याच्या वजनावरुन टीका केली होती आणि त्यानंतर त्या जोरदार ट्रोल झाल्या होत्या. पण आता मोहम्मद शमीच्या वादात शमा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
मोहम्मद शमीचे प्रकरण आहे तरी काय...
मोहम्मद शमीचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटो मोहम्मद शमी हा हा एनर्जी ड्रिंक्स पिताना दिसत होता. त्यानंतर मौलाना शहाबुद्दीन यांनी मोहम्मद शमीला गुन्हेगार ठरवले होते. मौलाना म्हणाले होते की, " रमझान हा आमच्यासाठी पवित्र महिना असतो. या महिन्यात आम्ही रोजा करत असतो. पण मोहम्मद शमीने रोज न ठेवता एक मोठा गुन्हा केला आहे. कारण या महिन्यात रोजा ठेवणे हे अनिवार्य असते. पण शमीने ते केले नाही आणि त्यामुळे तो गुन्हेगार ठरतो. "शमा मोहम्मद शमीबद्दल नेमक्या काय म्हणाल्या आहेत..
शमा मोहम्मद म्हणाल्या की, " इस्लाममध्ये रमजानच्या काळात रोजा ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट समजली जाते. पण दुसरीकडे इस्लाम हा एक वैज्ञानिक धर्म आहे, त्यामुळे इस्लाममध्ये कर्म ही सर्वात महत्वाची असतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती प्रवास करत असते तेव्हा रोजा ठेवला नाही तरी चालू शकते. सध्याच्या घडीला शमी हा भारतामध्ये नाही, तो परदेशात आहे आणि प्रवासात आहे. तो मैदानात उतरतो, कामगिरी करतो, आपला घाम गाळतो. मैदानात खेळत असल्यामुळे त्याला तहान लागू शकते. जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तुम्ही रोजा ठेवायलाच हवा, असे कोणीही म्हणत नाही. "शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर टीका केली होती. पण दुसरीकडे शमा मोहम्मद यांनी शमीवर टीका केलेली नाहीस तर त्यांनी त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे शमा मोहम्मद यांचे ट्रोलिंग आता कमी होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण रोहित शर्मावर टीका केल्यावर त्यांना जोरदार ट्रोल केले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ev2knWI
No comments:
Post a Comment