Breaking

Wednesday, March 29, 2023

आईचा जीव वाचवण्यासाठी लेकीचा दुर्गावतार; हल्ला करणाऱ्या कोल्ह्याचा थेट गळाच आवळला! https://ift.tt/Ymvl07S

सांगली : आई आणि मुलीच्या नात्यातील हळवेपणाबद्दल अनेकदा चर्चा होत असते. मात्र आईवर संकट आले तर मुलगी धाडसाने काय करू शकते, हे दाखवणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कवठेमहांकाळ येथील कोंगनोळी या ठिकाणी एका पिसाळलेल्या कोल्ह्याने महिलेवर हल्ला चढवला. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलेच्या मुलीने कोल्ह्याचा थेट गळा आवळून धरला आणि आपल्या आईची सुटका केली. मुलीने प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला. त्यामुळे सदर मुलीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, कोंगनोळी येथील आटपाडकर वस्तीवरील सुरेखा लिंगाप्पा चौरे या आपल्या मुलीसह पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. मात्र वाटेत अचानक एका पिसाळलेल्या कोल्ह्याने सुरेखा चौरे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कोल्ह्याने चौरे यांच्या हाताचा चावा घेत बोट धरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरेखा चौरे आणि त्यांची मुलगी भेदरुन गेली. आधी घाबरलेल्या मुलीने नंतर आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी धाडसाने पुढे येऊन कोल्ह्याचा थेट गळा आवळला. ज्यामुळे कोल्ह्याने तोंडात पकडलेला आईचा हात बाजूला झाला. यावेळी सुरेखा यांनी आरडाओरडा करत बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्ह्याने तिथून पळ काढला आणि दोघींनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/h6x5eHj

No comments:

Post a Comment