Breaking

Tuesday, April 25, 2023

रिक्षावाला आणि मेकॅनिकने केली हातमिळवणी; दोघांना एकच नाद, रिक्षा, दुचाकीचोरीचा लावला सपाटा https://ift.tt/DlH5Ron

: रिक्षा आणि दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघांना सीसीटीव्हीच्या साह्याने ओळख पटवून पिसवली गावातून रंगेहात बेड्या ठोकण्यात रामनगर पोलीसांनी यश मिळविले आहे. दारू ढोसून हौस-मौज करण्यासाठी रिक्षावाला आणि गॅरेजचा मेकॅनिक असलेल्या या दोघांनी चोऱ्यांचा सपाटा लावल्याचे समोर आले आहे. श्रीकांत शेडगे ( वय ४९ वर्षे, रा. पिसवली) आणि विक्रम साळुंखे ( वय ४३ वर्षे, रा. विठ्ठलवाडी) अशी अटक आरोपींची नावे असून श्रीकांत हा मेकॅनिक आहे तर विक्रम हा रिक्षा चालक आहे. २१ एप्रिल रोजी रात्री ठाकुर्ली-चोळेगाव परिसरात रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्ही फूटेजच्या सहाय्याने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. एका सीसीटिव्ही कॅमेरात ही रिक्षा चोरून घेऊन जाताना दोन चोरटे पोलिसांना दिसून आले. यासाठी सीसीटिव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. दोन्ही चोरटे कल्याण पिसवली परिसरात चोरी केलेल्या रिक्षाचे ऑटो पार्ट विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीनुसार रामनगरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, हवालदार निलेश पाटील, प्रशांत सरनाईक आदी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात दोन्ही चोरट्यांना अटक केली. श्रीकांत शेडगे आणि विक्रम साळुंखे असे चोरट्यांचे नावे आहेत. या दोघांना जडले होते. दारू ढोसून मौज-मज्जा करण्यासाठी या दोघांनी चोऱ्यांचा सपाटा लावला असल्याची माहिती समोर आली. या दोघांनी याआधी देखील अशा प्रकारे चोऱ्या केल्या असल्याचा पोलिसांचा कयास आहे. पोलिस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/AmqpVnG

No comments:

Post a Comment