Breaking

Tuesday, April 25, 2023

हॉस्टेल विद्यार्थिनीसाठी चांगले नसते सांगून विद्यार्थिनीला घरी नेत प्राध्यापकाचा अत्याचार, पत्नीचीही साथ https://ift.tt/P5zucId

: 'हॉस्टेल मुलींसाठी चांगले नसते तू आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहा. तुला चित्रपटात कामही देतो', असे सांगून एका ३० वर्षीय विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकाची पत्नी देखील सहभागी आहे. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शासकीय कला महाविद्यालयात एमपीए करते. तिसऱ्या सत्रात असताना सर्विस कोर्सची आवश्यकता असल्याने तिने ड्रामा विषय निवडला. या विषयासाठी ऑनलाईन पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील अशोक गुरप्पा बंडगर (रा. विद्युत कॉलनी बेगमपुरा) हे शिकवत होते. दरम्यान, काही दिवसांनी पुढे काय करावं याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता प्रा. बंडगर याने नाट्यशास्त्र विभागात जागा आहे, तुझा प्रवेश होऊन जाईल असे सांगून एमपीएसाठी आवश्यक असलेली कागदपत्रं नसतांना प्रा. बंडगरने प्रवेश करून दिला. काही दिवसांनी पीडित ही शिकवणी व परीक्षेसाठी विद्यापीठात आली असता तिने हॉस्टेल साठी अर्ज केला. मात्र त्यादरम्यान हॉस्टेल बंद होते. यावेळी नाट्यशास्त्र विभागात पीडितेला प्रा. बडगर भेटून मुलींसाठी हॉस्टेल चांगले नसते असे सांगून विद्युत कॉलनी येथील घरी घेऊन गेला. त्यांना दोन मुली आहेत. या मुलींसोबत पीडिता बहिणीप्रमाणे राहू लागली. दरम्यान पीडिता हॉल मध्ये झोपलेली असताना रात्री तीन वाजता प्रा. बंडगर हा तिथे आला व पीडितेला अतिप्रसंग केला. वारंवार अतिप्रसंग होत असल्याने पीडितेला संपूर्ण प्रकार त्याच्या पत्नी पल्लवीला सांगितला. यावेळी पल्लवी म्हणाली तू जे काही सांगत आहे ते मला मान्य आहे. तू हे घर सोडून जाऊ नको. तुझ्यामुळे माझा संसार उध्वस्त झाला आहे. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला दोन मुलीच आहे. तुझ्यापासून आम्हाला मुलगा पाहिजे. तू जर असे केलं नाही तर मी माझ्या जीवाचं बर वाईट करून घेईल अशी धमकी पीडितेला त्याला दिली.त्यानंतर प्राध्यापकाची पत्नी पीडितेला पतीसोबत झोपण्यासाठी पाठवत असे. यादरम्यान पीडिता ही बेशुद्ध पडली. खाजगी दवाखान्यात उपचार केले. त्यानंतर पीडितेला पेपर असल्याने तिला फक्त सही करून पेपर न देता प्राध्यापक घेरी घेऊन आला. त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान पीडितेची तब्येत बिघडली असल्याने तिचे वडील तिला घेण्यासाठी आले. यावेळी पती-पत्नीने मुलीचे पेपर सुरू असल्याने घेऊन जाण्यास विरोधक केला. मात्र आजारी असल्याने पीडिता वडिलांसोबत घरी गेली. पीडिता घरी असताना पती-पत्नीने संभाजीनगर येथे येण्यासाठी वारंवार फोन करायला सुरुवात केली. दरम्यान प्राध्यापकाच्या फोन धमक्या वाढल्याने पीडितेला वडिलांनी याबाबत विचारले असता तिने घडलेली हकीकत सांगितली. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला तक्रार समितीकडे तक्रार केली. या प्रकरणी विद्यापीठाने पती-पत्नीला नोटीस दिल्याने दोघांनी पीडितेला धमकी दिल्या. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात प्राध्यापक पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/d7aLCIs

No comments:

Post a Comment