Breaking

Saturday, April 1, 2023

अर्धशतकवीर डेव्हिड वॉर्नरच ठरला दिल्लीच्या पराभवाचा व्हिलन, जाणून घ्या कसा... https://ift.tt/jeQzvLy

लखनौ : डेव्हिड वॉर्नरने लखनौविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. पण अर्धशतक झळकावूनही वॉर्नर हाच दिल्लीच्या पराभवाचा व्हिलन ठरला आहे.लखनौच्या संघाने दिल्लीपुढे १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करायाला दिल्लीचा संघ मैदानात उतरला. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोन्ही धडाकेबाज खेळाडू मैदानात उतरले. त्यावेळी हे दोघे आता लखनौच्या गोलंदाजीवर आक्रमण करतील आणि संघाला चांगली सुरुवात करून देतील असे वाटले होते. पृथ्वीने यावेळी दोन खणखणीत चौकार लगावले आणि दिल्लीच्या फटकेबाजीचा आरंभ केला. त्यामुळे दिल्लीचा संघ आता मोठी सलामी देणार असे वाटत होते. पण लखनौच्या मार्क वूडने मात्र पृथ्वीला क्लीन बोल्ड केले आणि ही जोडी फुटली. त्यानंतरच्या चेंडूवर मार्क वुडने मिचेल मार्शला बाद केले आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. त्यानंतर मार्क वुडने सर्फराझ खानलाही बाद केले. या सर्व गोष्टी वॉर्नर पाहत होता. पण त्यावेळी वॉर्नरकडून कोणतेही प्रत्युत्तर पाहायला मिळाले नाही.डेव्हिड वॉर्नर हे नाव घेतले तर काही वर्षांपूर्वी गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळायचे. कारण वॉर्नर आपल्यावर तुटून पडणार, हे त्यांना माहिती असायचे. पण वॉर्नरची ही दहशत गेल्या काही वर्षांत दिसली नाही. गेल्या काही वर्षांत त्याच्या फलंदाजीतली आक्रमकता कमी झाली आणि वासरात लंगडी गाय शहाणी, असा वॉर्नर दिसायला लागला. वॉर्नर हे नाव ऐकून आजही काहींना धडकी भरत असेल. पण त्याच्याकडून मात्र तो फटकेबाजीचा धडाका पाहायला मिळत नाही, हेच सत्य आहे. या सामन्यात वॉर्नरने अर्धशतक झळकावले. दिल्लीकडून सर्वाधिक धावा केल्या. पण या त्याच्या खेळीच्या सामन्यावर प्रभाव किती पडला, तर काहीच नाही. त्याच्या या ५६ धावा म्हणजे फक्त आकडेवारी वाटत होती. त्याच्या अर्धशतकाचा कोणताच परीणाम दिल्लीच्या संघावर होऊ शकला नाही. जिथे संघाचा कर्णधारच शस्त्रांची धार दाखवत नसेल तिथे बाकीचे मावळे करणार तरी काय, हे पाहायला मिळाले. दिल्लीचे तीन विकेट्स वुडच्या एका स्पेलमध्ये गेले हे मान्य. पण त्यानंतर रिली रोसू आणि रोवमन पॉवेलसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फलंदाज दिल्लीकडे होते. या फलंदाजांना घेऊन वॉर्नरने आपला डाव बांधायला हवा होता. पण वॉर्नर फक्त आपल्याच फलंदाजीत मग्न असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वॉर्नरने जे अर्धशतक झळकावले तेच या पराभवाचे कारण ठरले. कारण वॉर्नर यावेळी अर्धशतकासाठी खेळताना दिसला पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी नाही.वॉर्नरच्या फलंदाजीत हा मोठा बदल झाला आहे. पण पुन्हा एकदा जुना धडाकेबाज वॉर्नर पाहायला मिळणार का, अशी आशा काही चाहत्यांच्या मनात असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/45E98Q1

No comments:

Post a Comment