लखनौ : धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर सहजपणे मात केली. लखनौच्या संघाने दिल्लीपुढे विजयासाठी १९४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण दिल्लीच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही आणि त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. लखनौने या सामन्यात दिल्लीवर तब्बल ५० धावांनी विजय साकारला. मार्क वुडने यावेळी दिल्लीच्या चार फलंदाजांना बाद केले.लखनौच्या संघाने दिल्लपुढे विजयासाठी १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा चांगली सुरुवात झाली नाही. कारण एकाच षटाकत लखनौच्या मार्क वूडने पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांना बाद केले. वुड यावेळी फक्त एवढ्यावर थांबला नाही तर त्याने त्यानंतर सर्फराझ खानलाही बाद केले आणि दिल्लीच्या संघाला तिहेरी धक्के दिले. वुडच्या वेगवनान माऱ्यानंतर रवी बिश्वोईच्या फिरकीच्या तालावर दिल्लीचा संघ नाचायला लागला. कारण त्यानंतर रवीने आपल्या फिरकीच्या जोरावर रिली रोसू आणि रोवमन पॉवेल यांना बाद केले. त्यामुळे दिल्लीची १३.४ षटकांत ५ बाद ९४ अशी स्थिती झाली होती. पण डेव्हिड वॉर्नर अर्धशतक झळकावत चांगली लढत देत होता. पण त्याला चांगली साथ मिळाली नाही आणि त्यांच्या हातून हा सामना निसटला.लखौनाचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि त्यांना पहिलाच धक्का कर्णधार लोकेश राहुलच्या रुपात बसल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुलला यावेळी फक्त आठ धावाच करता आल्या. राहुल लवकर बाद झाला आणि त्यानंतर दिल्लीकडे लखनौला अजून एक मोठा धक्का देण्याची संधी होती, पण त्यांनी ती दवडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावेळी धडाकेबाज सलामीवीर काइल मेयर्स हा चांगल्या फॉर्मात दिसत होता. यावेळी चेतनच्या गोलंदाजीवर मेयर्स हा मोठा फटका मारायला गेला. पण यावेळी त्याचे टायमिंग चुकले आणि चेंडू हवेत उडाला. हा चेंडू टिपण्यासाठी दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमद सज्ज झाला होता. खलील आता हा झेल पकडणार आणि मेयर्स बाद होणार असे वाटत होते. हा चेंडू खलीलच्या हातावर लागला खरा, पण त्याला झेल काही पकडता आला नाही आणि हीच दिल्लीकडून सर्वात मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले. मेयर्सने या जीवदानाचा चांगला फायदा यावेळी उचलला. मेयर्सने त्यानंतर वादळी फटकेबाजी केली आणि त्याने ३८ चेंडूंत दोन चौकार आणि सात षटाकारांच्या जोरावर ७३ धावांची दणदणीत खेळी साकारली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या निकोलस पुरननेही २१ चेंडूंत ३६ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच लखनौच्या संघाला १९३ धावांचा पल्ला गाठता आला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lX0MtWa
No comments:
Post a Comment