Breaking

Sunday, April 16, 2023

गोमूत्र शिंपडण्याऐवजी थोडे प्या, शहाणपण येईल; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल https://ift.tt/kd9mfVL

नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी संभाजीनगर सभेनंतर नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेत पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. या सभेत ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वावर जोरदार टीकास्त्र सोडले. हे लोक सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख, आमदार जयंत पाटील यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, 'आमचं हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. भाजपचे हिंदुत्व हे गोमूत्र हिंदुत्व आहे. गोमूत्र शिंपडण्याऐवजी थोडेसे प्या, अक्कल येईल.' रविवारी नागपुरात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिथे जनतेला संबोधित करताना ते म्हणाले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले, 'काँग्रेससोबत गेल्याने मी हिंदुत्व सोडले आहे असे ते म्हणतात. पण मला संघाला विचारायचे आहे की, तुमचे नेमके काय चालले आहे? मोहन भागवत मशिदीत गेले. एकीकडे हनुमान चालिसा म्हणायचा आणि दुसरीकडे मशिदीत कव्वाली ऐकायची. हेच त्याचं हिंदुत्व आहे.' भाजपने सांगावे त्यांचे हिंदुत्व काय आहे?संभाजी नगरमध्ये झालेल्या सभेत मुस्लिमांच्या उपस्थितीच्या प्रश्नावरही त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'होय, संभाजीनगरमधील सभेला सर्व जातीधर्माचे लोक आले होते. मुस्लिम सुद्धा आले होते. ते माणसे नाहीत का? इथे येणारे माणसे नाहीत का? भाजपने सांगावे त्यांचे हिंदुत्व काय?'. सरकारमुळे संपूर्ण देश आणि राज्य उद्ध्वस्त झाले आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी जिंकेपर्यंत मला थांबायचे नाही. गडगडाट करण्याची हिम्मत आहे का? असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DAMOSLl

No comments:

Post a Comment