हुबळी: भारतीय जनता पक्षाने हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून तिकीट नाकारल्यास किमान २० ते २५ जागांच्या मतदानावर याचा परिणाम होईल, असा इशारा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांनी शनिवारी दिला होता. जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर जगदीश शेट्टर हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. शेट्टर यांचा हा निर्णय निराशाजनक असल्याचं येडियुरप्पांनी म्हटलं आहे. शेट्टर हे हुबळी-धारवड मध्य येथील आमदार असून, या आठवड्याच्या सुरुवातीला पक्षश्रेष्ठींनी त्यांना या वेळी निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल्याने ते प्रचंड नाराज आहेत. भाजपने अद्याप १२ मतदारसंघांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली नसून, यात शेट्टर यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. जगदीश शेट्टर यांनी आज आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उत्तर कन्नड जिल्ह्यामधील सिरसीमध्ये विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांच्याकडे राजीनामा दिला. भाजपनं शेट्टर यांना तिकीट नाकारलं होतं. आता काँग्रेसनं त्यांना पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं आहे. हुबळी-धारवाड महापालिकेच्या १६ नगरसेवकांनी शेट्टर यांच्या समर्थनार्थ शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्याकडे आपले राजीनामे देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ‘या सर्वांनी आपुलकी दाखवल्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत’, असे शेट्टर म्हणाले. शेट्टर हे देखील लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते आहेत. बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकची जनता जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांना माफ करणार नसल्याचं म्हटलं. जनतेसमोर यो दोन्ही नेत्यांचं सत्य आणणार असल्याचं येडियुरप्पा म्हणाले.
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर
कर्नाटकमध्ये १० मे राजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यात वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कोलारमधूनही निवडणूक लढवण्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. या मतदारसंघात पक्षाकडून कोथूर जी. मंजूनाथ रिंगणात उतरतील. अर्थात, त्यांना वरुणा येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.लक्ष्मण सवदींना अथणीतून तिकीट
भाजपने तिकीट न दिल्याने नाराज होऊन शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना बेळगावी जिल्ह्यातील अथणी येथून तिकीट देण्यात आले आहेfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dWb79QM
No comments:
Post a Comment