नवी दिल्ली : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात विस्तवही जात नाही, असे म्हटले जात होते. पण आता या दोघांमधील खुन्नस कायम आहे, हे तमाम क्रिकेट विश्वाने आज पाहिले. दिल्ली आणि आरसीबी यांच्यात सामना झाला आणि या सामन्यानंतर कोहली आणि गांगुली यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला.आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील सामना एकतर्फी झाला. हा सामना आरसीबीने २३ धावांनी जिंकला. यावेळी कोहली आणि गांगुली हे सामना संपल्यावर मैदानात आले होते. या दोघांमध्ये यापूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे. कोहली कर्णधार असताना त्याला नेतृत्व सोडावे लागले होते. त्यावेळी कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे कोहलीचे कर्णधारपद हे गांगुली यांच्यामुळे गेले असे म्हटले जाऊ लागले होते. पण या प्रकरणात गांगुली यांची काही चूक नव्हती, असे समाजी निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले होते. कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष यांच्यात असा वाद हा चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. पण कोहली आणि गांगुली यांच्यामध्ये वाद नसल्याचे काही जणांना वाटले होते. पण आज मैदानात मात्र एक गोष्ट घडली आणि हा वाद आता चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामना संपला. सामना संपल्यावर दोन्ही संघ एकमेकांना हात मिळवतात. क्रिकेटसारख्या सभ्य खेळाची ही एक पद्धत आहे. त्यानुसार आरसीबीचे सर्व खेळाडू आणि दिल्लीचे खेळाडू हे हात मिळवण्यासाठी आमने सामने आले होते. एका रांगेत विराट कोहली होता, तर दुसऱ्या रांगेत सौरव गांगुली. कोहली आणि गांगुली हळूहळू समोरा समोर येत होते. पण जेव्हा कोहली समोर आले, तेव्हा गांगुली हे खेळाडूंच्या रांगेतून मागे हटले आणि त्यांनी कोहलीला हात न मिळवता पुढे गेले. गांगुली यांनी स्पष्टपणे कोहलीला हात मिळवला नसल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे आता गांगुली आणि कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.सौरव गांगुली यांनी असं करणं, हे उचित नाही. पण गांगुली यांनी असं का केलं, याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZOg49z6
No comments:
Post a Comment