लखनौ : कुख्यात गुंड आणि राजकारणी असलेल्या अतिक अहमद याच्यासह त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत असतानाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली गेली. पोलिसांच्या गाडीतून खाली उतरल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना पाठीमागून काही अज्ञात हल्लेखोरांनी आधी अतिक अहमद याच्यावर आणि नंतर अशरफवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.गोळीबारापूर्वी अतिक आणि अशरफ हे दोघे माध्यमांकडून विचारल्या जात असलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होते. पोलिसांच्या चकमकीत नुकताच अतिक अहमद याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अतिकने शुक्रवारी आपल्या वकिलामार्फत मुलगा असदच्या दफनविधीला उपस्थित राहण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला होता. त्यावर शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात निर्णय होणार होता, मात्र न्यायालयीन कामकाजापूर्वीच असदचा दफनविधी पूर्ण करण्यात आला. असदच्या दफनविधीला उपस्थित राहता आलं नाही, याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच अतिक अहमद म्हणाला की, 'मला नाही येऊ दिलं, त्यामुळे आलो नाही.' असदने हे शब्द उच्चारताच त्याच्या मागे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. थेट डोक्यात गोळी झाडण्यात आल्याने अतिक जागीच कोसळला. त्यानंतर काही कळण्याच्या आतच अशरफ याच्यावरही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.अतिक अहमद आणि गुंडगिरीचा इतिहासबहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची व त्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांची २४ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली होती. यावरून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या गुन्हेगारमुक्त राज्याच्या दाव्याला धक्का पोहोचला होता. उमेश पाल याच्या हत्येच्या आरोपाखाली समाजवादी पक्षाचा माजी आमदार अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, मुलगा असद व साथीदार गुलाम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. अन्य काही गुन्ह्यांसाठी गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला अतिक व बरेलीच्या तुरुंगात असलेला अशरफ यांना या हत्येनंतर प्रयागराज तुरुंगात ठेवण्यात आले; तर फरार असलेल्या अतिक व गुलामवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यांच्या मागावर असलेल्या विशेष कृती दलाच्या पोलिस पथकाला गुरुवारी ते झाशी येथे मोटारसायकलीवरून जाताना दिसले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. त्यांच्याकडे अत्याधुनिक विदेशी शस्त्रे सापडली होतीअतिकला सुनावली होती १४ दिवसांची कोठडी६० वर्षीय बाहुबली अतिकला गुरुवारी दोन धक्के सोसावे लागले होते. गुन्हेगार मुलगा गमावलेल्या दिवशीच अतिक व त्याचा भाऊ अशरफला पाल हत्याप्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. तसेच त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती. मात्र पोलिस कोठडीत असतानाच अतिक आणि अशरफ अहमदची हत्या करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GzM0VxO
No comments:
Post a Comment