नांदेड: भोकर तालुक्यातील रिठ्ठा गावात शनिवारी सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृतदेह आढळला. यावेळी तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. या प्रकरणी भोकर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. माधव दशरथ सकीरगे असं मृत तरुणाचे नाव आहे. माधव दशरथ सकीरगे हा मागील काही महिन्यांपासून रिठ्ठा गावात एकटा राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई-वडिलाचे निधन झालं होतं. गवंडी काम करुन तो स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. शुक्रवारी सायंकाळी तो कामावरून घरी परतला. सकाळी शेजाऱ्यांना त्या तरुणाचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती भोकर पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अनिल कांबळे, दिगांबर पाटील, संभाजी हानमंते, नामदेव शिराळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना मृतदेहा शेजारी दारूच्या बाटल्या, पुड्या आढळून आल्या. घरात टीव्ही देखील चालू होता. घातपात झाल्याच्या संशयावरुन भोकर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येच कारण मात्र अद्याप ही अस्पष्ट आहे. दरम्यान या घटनेने रिठ्ठा गावात एकच खळबळ उडाली आहे. रात्रभर घरातून येत होता टीव्हीचा आवाज माधव सकीरगे हा कामावरून घरी परतल्यानंतर झोपी गेला. रात्रभर त्याच्या घरातून टीव्हीचा जोर जोरात आवाज येत होता. सकाळी पण टीव्हीचा आवाज सुरूच होता. टीव्हीचा आवाज सुरूच असल्याने शेजारी राहणारे काही जण त्याच्या घरी गेले. यावेळी खिडकी उघडली असताना त्यांना माधवचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहताच शेजाऱ्यांना मोठा धक्काच बसला. तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमाराहत्या घरी एका तरुणाचा मृतदेह आढळ्याची माहिती मिळाल्यानंतर भोकर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा देखील केला. यावेळी पोलिसांना मयताच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. गुप्तांगावर तसेच तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाणीच्या खुना आढळून आल्या. दगडाने आणि लाकडाने मारहाण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9WMgXIJ
No comments:
Post a Comment