: 'नजर हटी दुर्घटना घटी', असे निर्देश असलेले फलक रस्त्यावर आपण लावलेले पाहतो. प्रवासादरम्यान आपण ते किती काळजीपूर्वक अमलात आणतो हा एक प्रश्नच आहे. आणि नेमका याचाच प्रत्यय आज बुलढाणा जिल्ह्यात आला. मलकापूर येथे असाच एक निष्काळजीपणाचा प्रकार पाहायला मिळाला. येथे एसटीचा अपघात होता होता वाचला आणि . या अपघातातून वाचलो आहोत, हे पाहून एसटी बसमधील सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.नाशिक ते नागपूर एसटी बस चालविणाऱ्या चालकाचा अंदाज चुकला आणि बस थेट रस्ते दुभाजकावर चढली. यामुळे ४७ प्रवाशांच्या हृदयाचे ठोके वाढले. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत न झाल्याने चालकाने सुटकेचा श्वास सोडला. मलकापूर येथे आज सकाळी सहाच्या सुमारास हा विचित्र परंतु तितकाच मजेदार अपघात घडला. ही बस दुभाजकावर चढून तेथे फसली. काहीही करून खाली उतरण्यास तयार नसलेल्या या बसला अखेर क्रेनच्या मदतीने रस्त्यावर आणण्यात आले. यानंतर ही बस पुढील प्रवासाकडे रवाना झाली.प्रवासी व बघ्यांच्या जीवाचा उडाला थरकापनाशिक आगाराची ही एसटी बस नाशिकवरून नागपूरला जात होती. जिल्ह्यातील मलकापूर शहरात महामार्गावर असलेल्या दुभाजकाचा चालकाला अंदाज न आल्याने बस दुभाजकावर चढली. यामुळे बसमधील प्रवासी व बघ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाले नाही. बस दुभाजकात फसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने एसटी बसला दुभाजकावरून बाहेर काढण्यात आले.चालकाला अंदाज न आल्याने ही एसटी बस दुभाजकावर चढली, सुदैवाने मोठा अपघात टळला अन्यथा हा अपघात हा भीषण रूप धारण करू शकला असता, असे एका प्रत्यक्षदर्शिने बोलताना सांगितलेनाशिक आगाराची बस नाशिकवरून नागपूर जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात महामार्गावर असलेल्या दुभाजकाचा चालकाला अंदाज न आल्याने बस दुभाजकावर चढली. या बसमध्ये एकूण ४७ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. बस दुभाजकाच्या मधोमध फसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने एसटी बसला दुभाजकावरून बाहेर काढण्यात आले. बस क्रमांक mh14bt 1306.. ही बस ज्या मधून एका मोठ्या अपघाताच्या अनर्थातून प्राण वाचले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TerlSEY
No comments:
Post a Comment