नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना भेटायला जात असताना राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती हिला तिच्या पतीसह ताब्यात घेतले आहे. आंदोलनासाठी ज्या ठिकाणी कुस्तीगीर बसले होते त्या ठिकाणी दिल्ली पोलिसांनी गुरुवारी कुस्तीपटूंना प्रवेश रोखला. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी जंतरमंतरवर पत्रकार परिषद घेतली. मात्र पोलिसांनी कुस्तीपटूंना आंदोलनस्थळी प्रवेश दिला नाही.विनेशची चुलत बहीण आणि माजी विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती आणि २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती गीता फोगट यांनी ट्विट केले आहे. तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती गीता फोगट हिने ट्विटमध्ये दिली आहे. ती पतीसोबत जंतरमंतरवर कुस्तीपटूंना भेटायला जात होती. गीता फोगटसह दोन ते तीन जणांना जहांगीरपुरीजवळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले. एका व्हिडिओ फुटेजमध्ये गीताला पोलिसांनी घेरले आहे आणि ती तिच्या चुलत भावाला भेटण्याची परवानगी मागत आहे असे दिसत आहे. बजरंगने बुधवारी रात्री जंतरमंतरवर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला पाठिंबा दर्शविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केल्याने निषेध स्थळाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जंतरमंतर येथे विरोध करणाऱ्या पैलवानांमध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी फोल्डिंग कॉट आणत असताना त्यांच्यात बाचाबाची झाली आणि ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. पैलवान विरोध का करत आहेत?बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांसारखे नामवंत कुस्तीपटू WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात जंतर-मंतरवर निदर्शने करत आहेत. त्यांनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध दोन एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत. जोपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंगला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असे कुस्तीपटूंनी जाहीर केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RNyWr2J
No comments:
Post a Comment