नागपूर : एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगून महिलेला १९ लाख ६७ हजार रुपयांनी गंडा घालण्याची गंभीर घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रिंकेश रूपचंद रामवानी (रा. एकम इंक्लेव्ह, नारी रोड, जरीपटका) व स्नेहा अशोक कटारीया (रा. फ्लॅट न. १३५, निभर, कमलकुंज चौक, जरीपटका) ,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. दुर्गा अनिल बिस्ट (वय २७, रा. गंगानगर, खरबी, वाठोडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. या दाम्पत्याने अनेकांची केल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये दुर्गा बिस्ट या धरमपेठेतील कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांची रिंकेश आणि स्नेहासोबत ओळख झाली. एचडीएफसी बँकेत व्यवस्थापक असल्याचे रिंकेश याने त्यांना सांगितले. २०२० मध्ये दुर्गा यांना एचडीएफसीच्या घाट रोड शाखेत खाते उघडायचे होते. त्यांनी रिंकेश याच्यासोबत संपर्क साधला. त्याने बिस्ट यांना खाते उघडून दिले. बिस्ट यांच्या खात्यात जमा व्हायचे लाखो रुपयेबिस्ट यांच्या खात्यात लाखो रुपये जमा व्हायचे. रिंकेश याने बिस्ट यांच्याशी संपर्क साधला. बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे बिस्ट यांनी रिंकेशला रोख गुगुलपेद्वारे एकूण १९ लाख ६७ हजार रुपये दिले. त्यांना व्याज मिळाले नाही व मूळ रक्कमही परत मिळाली नाही. रिंकेश याच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. बिस्ट यांनी गणेशपेठ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F93dAKq
No comments:
Post a Comment