Breaking

Friday, May 5, 2023

पुतण्याशी जागेवरून वाद झाला, शेतावर गेलेला काका घरी परतलाच नाही, तपासात धक्कादायक सत्य उघड https://ift.tt/oEK8NY7

वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शेत जमीन व जागेच्या वादातून पुतण्याने आपल्या ८४ वर्षीय म्हाताऱ्या काकाचा खून केल्याची घटना दिनांक ४ मे रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपीला आज अटक केली असता त्याला ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्माजी आनंदा तायडे (८४) व आरोपी पुतण्या रत्नदीप तायडे यांचे ४ मे रोजी सकाळी जागेवरून व शेताच्या जमिनीवरून घरी वाद झाले. त्यानंतर धर्मा आनंदा तायडे हे शेतामध्ये निघून गेले. रात्री दहा वाजता पर्यंत धर्माजी तायडे घरी न आल्यामुळे घरच्यांनी पोलीस चौकी गाठली आणि पोलिसांना सकाळी घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते घरी आले नाहीत यावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन पांचाळ, राजू बंगाले, नापोका सुखनंदन तांबारे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांनीशेतामध्ये जाऊन धर्माजी यांचा शोध घेतला असता ते बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांच्या डोक्यावर मार लागलेला होता व चेहरा रक्ताने माखलेला होता. जवळ जाऊन हृदयाचे ठोके व नाडी तपासली असता ते मृत झाल्याचे लक्षात आले. मृताच्या घरच्या मंडळीने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी आरोपी पुतण्या रत्नदीप नाथूराम तायडे (३५) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता रागाच्या भरात आपणच काकांचा खून केल्याची कबुली पुतण्याने दिली आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला ८तारखे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मृताचा मुलगा पुरुषोत्तम धर्माजी तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास प्रभारी ठाणेदार गजानन तडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी पुष्पलता वाघ करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे . आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १९१/ २०२३ कलम ३०२ भादविप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EoVTLZs

No comments:

Post a Comment