: जालना जिल्ह्यातील तालुक्यातील चुर्मापुरी शिवारात हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे कालव्यात उतरून पाणी पाणी खेळताना कालव्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने कालव्यात उतरून मुलाला वाचवण्याची शर्थ केली, पण दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. बराच वेळ झाला तरी पत्नी व मुलगा घरी न आल्याने रवींद्र गारुळे त्यांना पाहण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांना कालव्याच्या काठावर चप्पल आणि कपडे दिसल्याने काहीतरी अघटित झाल्याची शंका आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर वंदना गारुळे आणि त्यांच्या मुलाचा शोध सुरू झाला होता.तिसऱ्या दिवशी सापडला आईचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला आणि या दुर्दैवी घटनेची पुष्टी झाली होती. पण वंदना यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. कालव्याच्या बाजूने आज तिसऱ्या दिवशी ही शोध सुरू असताना अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारातील डाव्या कालव्याच्या पुलाजवळ सकाळी नातेवाईक व नागरिकांना वंदना यांचा मृतदेह सापडला. वंदना बेपत्ता असल्याने त्यांचा शोध नातेवाईक व नागरिक दुचाकी वरून घेत होते. या दरम्यान आज दिनांक ५ मे रोजी सकाळी अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारातील पुलाजवळ डाव्या कालव्यातील काटेरी झुडपाला अडकलेला एक महिलेचा मृतदेह दिसून आला. नातेवाईक व गावकऱ्यांनी मिळून काटेरी झुडपात अडकलेला मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर त्या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह वंदना गारुळे यांचा होता. अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वंदना यांचा मृतदेह नेण्यात आला व तिथेच त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. अंबड तालुक्यातील दह्याळा येथे वंदना रवींद्र गारुळे (वय ३५) ही महिला कुंटुंबासोबत नातवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्नावरुन येऊन आपला मुलगा सार्थक रवींद्र गारुळे (वय ९) हे हे दोघे सोबत दुपारी ४ वाजता डाव्या कालव्यावर धुणे धुण्यासाठी गेले. आई धुणे धुत असताना सार्थक पाण्यात खेळण्यासाठी कालव्यात उतरला. पाण्यात खेळता खेळता त्याचा पाय घसरला. त्याला वाचायला आई वंदना गेली असता दोघेही कालव्याच्या पाण्यात बुडाले. बऱ्याच वेळ होऊनही धुणे धुण्यासाठी गेलेली मुलगा बायको घरी परत नाही आल्यामुळे रवींद्र गारुळे कालव्यावर गेले असता त्यांना कालव्याच्यावरती धुण्यासाठी नेलेले कपडे आणि चपला आढळून आले. ४ मे रोजी सार्थकचा मृतदेह अंतरवाली सराटी डाव्या कालव्याच्या बाहेर काढण्यात आला. तर आज दिनांक ५ मे रोजी वंदना गारुळे यांचा मृतदेह चुर्मापुरी शिवारात डाव्या कालव्यातून बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर दह्याळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या माय लेकरांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kv8BaFs
No comments:
Post a Comment