लखनौ : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाचा घटनाक्रम नेमका काय होता, फक्त पाच पॉइंटमध्ये जाणून घेऊया...१) लखनौची फलंदाजी सुरू होती. डावाचे चौथे षटक होते. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्याने लाँग ऑफला चेंडू टोलविला. तेथे विराट कोहलीने त्याचा झेल टिपला. या वेळी कोहलीने जोरदार जल्लोष केला. त्याने छातीवर हात मारला आणि ओठांवर बोट ठेवून लोकांना शांत राहण्यास सांगितले.२) १६व्या षटकात कोहली धावत आला आणि त्याने दहाव्या क्रमांकाचा फलंदाज नवीन-उल-हक याच्याकडे बघून काहीतरी इशारा केला. यामुळे नवीनही कोहलीच्या दिशेने आला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगली. यात पंच आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा अमित मिश्रा यांनी मध्यस्थी केली. यानंतर कोहलीने बुटांनाला लागलेली माती काढली आणि बुटांकडे इशाराही केला.३) लढत संपल्यानंतर लखनौ आणि बेंगळुरूचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करीत होते. त्या वेळी कोहलीने नवीनशीही हात मिळवला. त्या वेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद रंगला. यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला. त्यामुळे कोहली चिडला. त्याच्याकडे कोहलीने पुन्हा त्याला सुनावले.४) यानंतर कोहली मैदानातून येत असताना त्याचा लखनौच्या काइल मेयर्ससोबत संवाद सुरू होता. तेथे गौतम गंभीर आला. आणि तो मेयर्सचा हात हातात घेऊन त्याला ओढून घेऊन गेला. याच वेळी गंभीर आणि कोहली काहीतरी पुटपुटले. यातून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.५) कोहली त्या वेळी काय बोलला, हे कळले नाही; पण त्यामुळे गंभीरचा पारा चढला. तो कोहलीच्या दिशेने जाऊ लागला. लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. दुसरीकडे, कोहलीही शांत नव्हता. त्यालाही बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिससह इतरांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर-कोहली आमनेसामने आलेच. या वेळी दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. सुरुवातीला कोहलीने गंभीरच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही अमित मिश्राने मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. यानंतर कोहली आणि लोकेश राहुल यांच्यात दीर्घ चर्चा झाली. त्या वेळीही नवीन तेथे आला होता. तो रागातच होता. विराट आणि गंभीर यांच्यातील वादाचा हा घटनाक्रम होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NWLVzlG
No comments:
Post a Comment