कोटा: एका प्रेमी युगुलाच्या प्रेमाचा अत्यंत भयानक शेवट झाला आहे. या दोघांचाही सांगाडा पोलिसांनी जंगलात सापडला. हे दोघे गेल्या ४१ दिवसांपासून बेपत्ता होते. ४१ दिवसांनी ते नाही तर त्यांचा सांगाडा पोलिसांना सापडला. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कनवास पोलिस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील किशोरपुरा घनदाट जंगलात पोलिसांना छिन्नविछिन्न परिस्थितीत दोन सांगाडे सापडले. वन्य प्राण्यांनी हे मृतदेह खाल्ले होते, त्यांच्या शरीराचे काही भाग आसपास पसरलेले होते. महिलेच्या शरीराचा मानेच्या वरचा भाग वाचलेला होता. बाकी पूर्ण शरीर प्राण्यांनी खाल्लं होतं. कनवास पोलिस सध्या या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून पाहत आहेत. पण, पोलिस इतर पैलूंचाही तपास करत आहेत. तर गावकऱ्यांकडूनही हत्येची भीती व्यक्त केली जात आहे. हे दोघेही गेल्या ४१ दिवसांपासून बेपत्ता होते. हे दोघेही विवाहित असून त्यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. हे दोघेही ४१ दिवसांपूर्वी घरातून पळून गेल्याची माहिती आहे. बाबूलाल (वय ३०) आणि धापू बाई (वय २१) हे दोघंही गेल्या ९ मार्चपासून कोटामधील किशोरपुरा गावातून बेपत्ता झाले होते. नातेवाइकांनी कनवास पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यांचे नातेवाईकही त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर, मेंढपाळाने दिलेल्या२२ एप्रिलला पोलिसांना हे मृतदेह सापडले. दोघांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. चप्पल, कपडे, सोन्याचे दागिने यावरून मृतांची ओळख पटली. घटनास्थळावरून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळाजवळ महिलेने घातलेले सोन्याचे दागिने आणि पैजणही पडलेली आढळून आली. पोलिसांना हाडांचा चुराही आढळून आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी जंगलात हे मृतदेह सापडले ते रस्त्यापासून सुमारे ३ किमी अंतरावर आहे. या परिसरात जास्त रहदारी नसते. या परिसरात तरस, कोल्हा आणि रानडुकरं मोठ्या प्रमाणात आढळतात. वैद्यकीय पथकाने शवविच्छेदन करून दोघांचे सांगाडे नातेवाईकांच्या ताब्यात दिले.दोघांची हत्या करून मृतदेह कोणीतरी टाकून दिल्याची भीती बाबूलालच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. तर पोलिस या दोन्ही मृतदेहांना संशयास्पद मानून तपास करत असल्याचं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. मृत बाबूलाल आणि धापूबाई दोघेही किशोरपुरा गावचे रहिवासी आहेत. बाबूलालचे आधीच लग्न झाले होते. त्याला दोन मुलंही आहेत. तर धापूबाईचा विवाह झालावाड जिल्ह्यात झाला होता. जिथून ती तिच्या माहेरी किशोरपुरात आली होती. ती बऱ्याच काळापासून इथेच राहत होती. धापूबाईला घेण्यासाठी तिचे सासरचे लोक ९ मार्च रोजी किशोरपुरा गावात पोहोचले होते. मात्र, यावेळी ती पळून गेली आणि मग थेट ४१ दिवसांनंतर बाबूलाल आणि धापूबाईचा मृतदेह आढळला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SIaJWRo
No comments:
Post a Comment