जळगाव : शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार गेले होते. त्यापैकी चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले होते. नागपूरचाही पळून गेला. बुलढाण्याचाही पळून गेला, जळगावचे गेले नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले. नाशिक ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. मी तर ३३ नंबरला गेलो. माझ्या आधी ३२ जण गेले होते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.मी एकट्याने उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं? सर्वच शिंदेंसोबत पळून गेले होते. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जाहीरी टीका होत गेल्या. मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा झाला नसता. मात्र मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो आहे. १९८७मध्ये मी शिवसैनिक झालो. बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेनेसाठी काम केले. आणि आता हे माझ्यावर टीका करत आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात विरोधकांचा समाचार घेतला. हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही. १५ ते २० वेळा मी जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य मी संघर्षात घातलं. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही. मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती.एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी मी सट्टा खेळलो. भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भाजपसोबत गेलो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षासोबत गेलेलो नाही. अजूनही शिवसेने सोबतच आहोत. त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेलो नाही, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cMv1O7V
No comments:
Post a Comment