Breaking

Monday, May 1, 2023

समृद्धी महामार्गावर बिअरच्या बाटलांचा सडा, बॉक्स उचलण्यासाठी तरुणांपासून वृद्धांची धावाधाव https://ift.tt/VZw8e9p

वर्धा: समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना महाकाळ शिवारात घडली. यावेळी ट्रकमधल्या बिअरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बाटलांसाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. जेवढ्या हाती येतील तेवढ्या बाटल्या घेत अनेकांनी पळ काढला. दारूबंदी जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच चांदी झालीय.नागपूरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच ४० पीएम २६१५ क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बिअरचे बॉक्स घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी करकचून ब्रेक मारला. मात्र, यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. ही घटना महाकाळ शिवारातील चॅनेल नंबर ५२ प्लस २०० नजीक घडली.सदर घटनेत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बिअरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियइरच्या बाटल्या लंपास केल्याची चर्चा आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LfMp0KE

No comments:

Post a Comment