लखनौ : विराट कोहली हा सध्याच्या घडीला एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना सुरु असताना एक चाहता मैदानात घुसला होता. मैदानात घुसलेल्या या चाहत्याबरोबर कोहलीने जे काही केले ते पाहून त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. कोहलीच्या या कृतीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.ही गोष्ट घडली जेव्हा आरसीबीचा संघ हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सातव्या षटकानंतर ही गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. त्यावेळी लखनौचे कृष्णप्पा गौतम आणि मार्कस स्टॉयनिस हे फलंदाजी करत होते. त्यावेळी एक चाहता सुरक्षा रक्षकांना चकवत मैदानात घुसला. मैदानात घुसल्यावर त्याने विराट कोहली नेमका कुठे आहे हे त्याने हेरले आणि तो त्याच्या दिशेने धावत गेला. हा चाहता कोहलीच्या जवळ गेला आणि त्याने विराटचे पाय धरले. तो विराटच्या पाया पडायला लागला. त्यावेळी विराटने त्याला उठवले. आपला चाहता समोर आल्याचे पाहून विराटही गहिवरला. यावेळी विराटने त्याला मिठी मारली आणि त्यामुळे चाहताही खूश झाल्याचे पाहायला मिळाले. हे सर्व घडत असताना सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, हे कोणालाच समजले नाही. विराटने मिठी मारली आणि त्यानंतर तो चाहता धावत गेल्याचे पाहायला मिळाले. पण हा चाहता कुठून आणि कसा आला व नेमका कुठे गेला हे कोणालाही समजले नाही. या सर्व प्रकारानंतर आता लखनौच्या मैदानातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. कारण जर असा कोणीही व्यक्ती जर कोहलीसारख्या खेळाडूला सहज भेटून जात असेल तर सुरक्षा रक्षक नेमके काय करतात, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या सामन्यानंतर सुरक्षेचाा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.विराट कोहलीला आजच्या सामन्यात आरसीबीचे कर्णधारपद गमवावे लागले. त्यानंतर कोहलीला फलंदाजीतही चांगली कामगिरी करता आली नाही. टी - २० सामन्यात त्याने ३० चेंडूंच ३१ धावा केल्या आणि तो यष्टीचीत झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2t3hOP5
No comments:
Post a Comment