अहमदाबाद : गुजरातच्या संघापुढे अखेर मुंबईच्या संघाने शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने २३३ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने चांगली लढत दिली. सूर्यकुमार यादवने अर्धशतकही झळकावले. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि तिथेच हा सामना मुंबईच्या हातून निसटला. त्यामुळे आता गुजरात टायटन्स अंतिम फेरीत दाखल झाली आहे आणि त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आता २८ जूनला अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. मुंबईचा गुजरातने यावेळी ६२ धावांनी विजय मिळवला.मुंबईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईच्या संघाने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून यावेळी नेहाल वधेराला संधी दिली होती. कारण गेल्या सामन्यात नेहालने तुफानी फटकेबाजी केली होती. दुसरीकडे इशान किशनही दुखापतग्रस्त झाला होता आणि तो सलामीला येऊ शकणार नव्हता. त्याचबरोबर नेहालही डावखुरा असल्यामुळे त्याला सलामीला आणण्याची खेळी मुंबई इंडियन्सने केली खरी, पण हा प्रयोग त्यांचा यशस्वी ठरला नाही. कारण नेहाल यावेळी फक्त चार धावांवर आऊट झाला. त्यामुळे मुंबईचा हा प्रयोग फसला. त्यानंतर रोहितच्या खांद्यावर संघाची जबाबदारी होती. पण रोहित पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहित यावेळी फक्त आठ धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला सुरुवातीला हे दोन धक्के बसले होते. मुंबईला हे दोन्ही धक्के दिले होते ते मोहम्मद शमीने. पण रोहित बाद झाला तरी मुंबईचा संघ हतबल झाला नाही. मुंबईला त्यानंतर अजून एक धक्का बसला. कारण कॅमेरून ग्रीनला यावेळी दुखापत झाली. त्याच्या हातावर चेंडू बसला. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने कमाल केली. तिलकने यावेळी तुफानी फटकेबाजी कर गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. पण त्याची ही आक्रमकता जास्त काळ टिकू शकली नाही. पण तिलकने यावेळी १४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४३ धावांची दमदार खेळी साकारली. तिलक बाद झाला आणि त्यानंतर दुखापत झालेला ग्रीन हा फलंदाजीला आला. त्यानंतर ग्रीन आणि सूर्या यांची चांगली भागीदारी पाहायला मिळाले. पण ग्रीन यावेळी बाद झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला. ग्रीनने यावेळी २० चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३० धावा केल्या. सूर्याने यावेळी अर्धशतक झळकाले पण मोक्याच्या क्षणी तो ६१ धावांवर बाद झाला आणि तिथेच सामना मुंबईच्या हातून निसटला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BZX7iIF
No comments:
Post a Comment