Breaking

Friday, May 26, 2023

गिलच्या बॅटमधून धावा नाही तर रेकॉर्ड निघाले; मुंबई इंडियन्स कधीच विसरणारी नाही ही बेदम धुलाई https://ift.tt/1PxDy8W

अहमदाबाद: आयपीएल २०२३ च्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये शुभमन गिलने मुंबई इंडियन्स विरुद्ध धमाकेदार शतक झळकावले. गिलचे हे या हंगामातील तिसरे शतक आहे. त्याने फक्त ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. गिलने ६० चेंडूत १२९ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. गिलच्या या खेळीने आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमधील अनेक विक्रम मोडले गेले. आयपीएल २०२३ मध्ये गिलने फक्त ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. हे शतक त्याने दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत पूर्ण केले. त्याच बरोबर त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील झाले. या खेळीनंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने देखील त्याचे कौतुक केले. - मुंबई इंडियन्स विरुद्धच्या शतकी खेळीबरोबरच शुभमनने या हंगामात ८०० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो फक्त चौथा फलंदाज आहे. याआधी विराट कोहीलने ९७३, जोस बटलरने ८६३ तर डेव्हिड वॉर्नरने ८३८ धावा केल्या आहेत. - शुभमन गिलने शतक झळकावत प्लेऑफमध्ये शतकी खेळी करणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने २३ वर्ष आणि २६०व्या दिवशी ही कामगिरी केली. - गिलने फक्त ३२ चेंडूत अर्धशतक तर ४९ चेंडूत शतक केले. प्लेऑफमध्ये सर्वात वेगाने शतक करण्याबाबत तयाने ऋद्धिमान साहा आणि रजत पाटीदार यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. - एका हंगामात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम विराट कोहली आणि जोस बटलर यांच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येकी चार शतक केली आहेत. या यादीत गिल आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने ३ शतक केली आहेत. एका हंगामात ३ शतक करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. - प्लेऑफच्या लढतीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुजरातच्या नावावर झाला आहे. त्यांनी आज २३३ धावांचा डोंगर उभा केला, याबाबत गुजरातने पंजाबचा २०१४ मधील २२६चा विक्रम मागे टाकला.- एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली ९७३ धावांसह अव्वल तर जोस बटलर ८६३ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गिल या यादीत ८५१ धावांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. - आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक चौकार मारण्याबाबत गिल १११ चौकारांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत बटलर १२८ चौकारांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय फलंदाजांमध्ये तो याबाबत दुसऱ्या स्थानाव आहे. तर विराट कोहली १२२ चौकारांसह पहिल्या स्थानावर आहे. - गिलने साई सुदर्शनसह १३८ धावांची भागिदारी केली. प्लेऑफमधील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी ठरली. - गिलने त्याच्या डावात १० षटकार मारले. प्लेऑफमध्ये एका खेळाडूकडून मारण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार आहेत.- गिलने १२९ धावांची खेळी केली. प्लेऑफमधील मॅचमधील एखाद्या फलंदाजाकडून झालेली ही सर्वोच्च खेळी आहे. - आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूकडून झालेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे. याबाबत केएल राहुल १३२ धावांसह अव्वल स्थानी आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MZ7gylB

No comments:

Post a Comment