Breaking

Tuesday, May 30, 2023

Petrol Rate Today: कच्चा तेलाची घसरगुंडी, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल झाले का स्वस्त? लगेच पाहा https://ift.tt/FMsm4ur

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे. यादरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर सुधारित केले आहेत. या आधारे आजही देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे दिसून येते. मात्र, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे देशातील अनेक शहरांमध्ये वाहन इंधनाच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे.आंतरराष्ट्रीय क्रूड ऑइलचा भावजागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड तेलाची किंमत आज ४.५८ टक्क्यांनी घसरून ७३.५४ डॉलर प्रति बॅरलवर घसरली आहे. याशिवाय, WTI क्रूडच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल $६९.४८ वर व्यवहार करत आहे.दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतारानंतर २१ मे २०२२ पासून राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. एका वर्षापासून वाहन इंधनाचे दर ना वाढलेत किंवा कमीही झालेले नाहीत. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट क्रूडची जुलैची फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $७३.५४ तर WTI चे जुलै फ्युचर्स आता प्रति बॅरल $६९.७० वर आहे.गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूडचा प्रति बॅरल भाव विक्रमी पातळीवर पोहोचला होता. कच्च्या तेलाची किंमत १३० वरून ७३ डॉलरवर आले असले तरीही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल अजूनही १०० रुपये प्रति लिटर दराने उपलबध आहे. तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहे तर, ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेलचा दरही १०० रुपयांच्या वर आहे.पेट्रोल-डिझेलचा आजचा भावIOC ने जारी केलेल्या दरानुसार, आज मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये, तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून अपडेट केले जातात. वाहतूक खर्च, कर आणि डीलर कमिशन यांचा त्यात समावेश असतो. तसेच तुम्ही मोबाईलमधून एक SMS पाठवूनही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती तपासू शकतात.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yts5XH9

No comments:

Post a Comment